शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 11:45 IST

इस्त्रायलकडूनही अमेरिकेवर सातत्याने युद्धात उतरण्यासाठी दबाव येत आहे. इराणी मिसाईल हल्ले रोखता रोखता इस्त्रायल एअर डिफेन्सच्या नाकीनऊ आले आहेत. 

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने इराणला मागे न हटल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देत आहेत. इराण-इस्त्रायल युद्धात अमेरिका उडी घेणार का यावरही ट्रम्प नकार देत नाहीत. त्यातच मध्य पूर्वेत बनलेल्या अमेरिकन तळांवर मिसाईल हल्ल्याची तयारी इराण करत असल्याचे समोर आले आहे. अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सनं हा दावा केला आहे. जर इराणने असे काही केले तर डोनाल्ड ट्रम्प यांना एक निमित्त मिळेल आणि अमेरिकादेखील या युद्धात सक्रियपणे उतरू शकते. 

अमेरिकेने ३ डझन रिफ्यूलिंग एअरक्राफ्ट युरोपला पाठवले आहेत. ज्याचा मध्य पूर्वेत असलेल्या अमेरिकन तळांचे रक्षण करणाऱ्या फायटर जेटच्या मदतीसाठी वापर केला जाऊ शकतो. सूत्रांनुसार, इराणकडून अमेरिकन तळांवर हल्ला केला जाण्याची शक्यता आहे. इस्त्रायलकडूनही अमेरिकेवर सातत्याने युद्धात उतरण्यासाठी दबाव येत आहे. इराणी मिसाईल हल्ले रोखता रोखता इस्त्रायल एअर डिफेन्सच्या नाकीनऊ आले आहेत. त्याला पुन्हा नव्याने उभं करण्याचीही गरज आहे. 

त्याशिवाय जर अमेरिकेने इराणच्या न्यूक्लियर साईटवर हल्ला केला तर लाल समुद्रात हुथी बंडखोरही हल्ले करू शकतात. ते अनेक देशांच्या जहाजांना टार्गेट करू शकतात. सोबतच इराक आणि सीरिया येथील इराण समर्थक जिहाद संघटनाही अमेरिकन ठिकाणांना टार्गेट करू शकते. इराणकडून होर्मुज स्ट्रेट यांनाही रोखण्याचा प्रयत्न होऊ शकतो. सध्या अमेरिका सौदी अरब, जॉर्डन आणि यूएईमधील त्यांच्या सैनिकांना सतर्क राहण्यास सांगत आहे. पश्चिम आशियात अमेरिकेचे जवळपास ४० हजार सैन्य तैनात आहेत. 

इराकमधील अमेरिकन तळांवर इराणची नजर

दरम्यान, जर इस्त्रायलच्या समर्थनार्थ अमेरिकेने त्यांचे सैन्य पाठवले तर इराकमधील अमेरिकन ठिकाणांना टार्गेट करण्यात येईल असं २ इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने न्यूयॉर्क टाइम्स रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसेच आमच्या शत्रूंनी लक्षात ठेवावे, केवळ सैन्य बळाने काही मिळवू शकत नाही, जर इराणवर युद्ध थोपवले तर काहीच निष्पन्न होणार नाही असंही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प