शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

Watch Video: इराणच्या नौदलाला जबर धक्का; सर्वात मोठी युद्धनौका रहस्यमयरित्या बुडाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 15:44 IST

Iran Navy's Largest Ship Fire: युद्धनौकेवर उंच उंच आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. य़ा युद्धनौकेचे नाव खर्ग होते. हे जहाज मुख्य तेल टर्मिनलच्या रुपात इराणसाठी काम करत होते. युद्धनौकेला लागलेल्या आगीचा कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

तेहरान : इस्त्रायलसोबत सुरु असलेल्या तनावामध्ये इराणला  (Iran Navy) जबर धक्का बसला आहे. ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ तैनात असलेली सर्वात मोठी युद्धनौका रहस्यमयरित्या आग लागून बुडाल्याने खळबळ उडाली आहे. या युद्धनौकेची आग एवढी भीषण होती की, अंतराळातूनदेखील दिसत होती. (Kharg, the largest vessel in Iran's navy, sank early Wednesday in the Gulf of Oman near the port of Jask)

युद्धनौकेवर उंच उंच आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. य़ा युद्धनौकेचे नाव खर्ग होते. हे जहाज मुख्य तेल टर्मिनलच्या रुपात इराणसाठी काम करत होते. युद्धनौकेला लागलेल्या आगीचा कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

युद्धनौकेवरील सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. खर्ग जहाज एका ट्रेनिंग मिशनवर गेले होते. रात्री जवळपास सव्वा दोन वाजता या जहाजाला आग लागली. अग्निशमन दलाने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, २० तासांच्या प्रयत्नानंतरही हे जहाज जस्क बंदराजवळ बुडाले. याचा व्हिडीओदेखील पाहता येईल...

सोशल मीडियावर या बुडत्या जहाजाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आग एवढी भयानक होती की, धुराचे लोट अंतराळातूनही दिसत होते. खर्ग युद्ननौका इराणसाठी एवढी महत्वाची होती, की ती अन्य जहाजांची गरज लागल्यास जागा घेत होते. मल्टीटास्किंग जहाज होते. तसेच मोठ्या प्रमाणावर युद्धसामग्री, साहित्या घेऊन जाऊ शकत होते. हेलिकॉप्टरदेखील यावरून उड्डाण करू शकत होते. ही युद्धनौका इराणने 1984 मध्ये घेतली होती. ब्रिटनने ही युद्धनौका 1977 मध्ये तयार केली होती. 

टॅग्स :Iranइराणwar shipयुद्ध नौकाfireआग