शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 09:39 IST

Seyed Abbas Araghchi, Iran Israel War: युद्ध थांबवण्यासाठी फक्त एक कॉल पुरेसा असल्याचा दावा इराणच्या मंत्र्यांनी केला आहे

Seyed Abbas Araghchi, Iran Israel War: इराण आणि इस्रायलमधीलयुद्ध पाचव्या दिवशीही सुरूच आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्ले केले जात आहेत. जगातील सुपरपॉवर समजल्या जाणाऱ्या काही बलाढ्य देशांनी इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे, तरीही हल्ले सुरूच आहेत. परंतु हे युद्ध फक्त एका फोन कॉलने थांबवता येऊ शकते असा दावा केला जात आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सोमवारी सांगितले की अमेरिका फक्त 'एका फोन कॉल'ने इस्रायलचे इराणवर होणारे हल्ले थांबवू शकते.

एक फोन कॉल आवश्यक...

"जर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प राजकीय धोरणांबद्दल प्रामाणिक असतील आणि हे युद्ध रोखण्यात त्यांना रस असेल, तर पुढील पावले परिणामकारक ठरतील. इस्रायलने त्यांची आक्रमणे थांबवावीत. जर आमच्याविरुद्ध लष्करी आक्रमकता सुरू राहिली तर आम्हीही प्रत्युत्तर देतच राहू. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू यांच्यासारख्या व्यक्तीला शांत करण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातून फक्त एक फोन कॉल आवश्यक आहे. यामुळे युद्ध थांबवता येईल आणि राजकीय ध्येयधोरणांचा मार्ग मोकळा होऊ शकेल," असे अराघची यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

ट्रम्प यांची इराणला धमकी

दरम्यान, ट्रम्प यांची इराणवर नाराजी स्पष्टपणे दिसून आली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे की, "मी इराणला ज्या 'करारावर' स्वाक्षरी करायला सांगितली होती, त्यावर इराणने स्वाक्षरी करायला हवी होती. त्यांनी तसे केले नाही आणि आता युद्धात अनेकांचे बळी जात आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर, इराणकडे अण्वस्त्र असू शकत नाहीत. मी हे वारंवार सांगितले आहे! प्रत्येकाने ताबडतोब तेहरान सोडले पाहिजे!" अशी पोस्ट ट्रम्प यांनी केली.

दोन्ही देशांचे खूप नुकसान

दरम्यान, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धात इराणचे सुमारे ३० लष्करी अधिकारी आणि शास्त्रज्ञांसह सुमारे २३० लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि १२०० हून अधिक जखमी झाले आहेत. तर इस्रायलमध्ये २४ हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि सुमारे २५० जण जखमी झाले आहेत.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्धDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका