शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 19:05 IST

Iran-Israel War: इराणनने या पर्वतात सर्वात मोठा अणुउर्जा प्रकल्प उभारल्याची माहिती मिळत आहे.

Iran-Israel War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवार(२० जून) सांगितले की, अमेरिकन विमान बी-२ बॉम्बरने इराणमधील सर्वात सुरक्षित ठिकाण फोर्डो उद्ध्वस्त केले. तसेच, इतर अणुस्थळ नतान्झ आणि इस्फहान देखील नष्ट करण्यात आले आहेत. काही वृत्तांत असा दावा करण्यात आला आहे की, इराणने हल्ल्यापूर्वीच फोर्डोहून आपले युरेनियम एका गुप्त ठिकाणी हलवले असून, तेथून ते सहजपणे आपला अणुकार्यक्रम सुरू ठेवू शकतात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणमधून ४०० किलो युरेनियम गहाळ झाले आहे. इराणने हे युरेनियम कुह-ए-कोलांग गज(पिकॅक्स पर्वत) मध्ये लपवल्याचा अंदाज आहे. दावा केला जातो की, इराणने या पर्वतात फोर्डोपेक्षाही मोठा अणुउर्जा प्रकल्प बांधला आहे, ज्याबद्दल कोणालाही फारशी माहिती नाही. अमेरिका आणि इस्रायली सरकारे म्हणतात की, त्यांनी त्यांच्या हल्ल्यांनी इराणचा अणुकार्यक्रम नष्ट केला. परंतु दुसरीकडे, ट्रम्प असेही म्हणतात की, इराणने अणु करार स्वीकारला पाहिजे. जर अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचा अणुकार्यक्रम नष्ट झालाय, तर मग ते कोणत्या अणुकराराबद्दल बोलत आहेत?

अमेरिका-इस्रायलचा सुगावाही लागणार नाहीआंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) महासंचालकांनी इराणला पिकॅक्स पर्वताखाली काय चालले आहे? असे विचारले, तेव्हा इराणचे उत्तर थोडक्यात आणि तीक्ष्ण होते. इराणी अधिकाऱ्यांनी म्हटले, "याचा तुमच्याशी काहीही संबंध नाही." या पर्वतातील प्रकल्प फोर्डोपेक्षाही मजबूत असल्याचे म्हटले जाते. 

एप्रिलमध्ये इन्स्टिट्यूट फॉर सायन्स अँड इंटरनॅशनल सिक्युरिटीने प्रकाशित केलेल्या उपग्रह प्रतिमेवरून असे दिसून आले की, या पर्वताच्या तळाभोवती एक नवीन सुरक्षा रिंग बांधत आहे. ISIS ने एप्रिलच्या मूल्यांकनात म्हटले की, या ठिकाणी फोर्डोपेक्षाही मोठा आणि खोलवर पसरलेला हॉल आहेत. याबद्दल अद्याप फारशी माहिती नाही, परंतु अनेकांचा असा विश्वास आहे की, हल्ल्यापूर्वी इराणने आपले युरेनियम पिकॅक्स पर्वतावर हलवले असावे, ज्यामुळे इराणला त्यांचा अणुशस्त्र कार्यक्रम पुन्हा सुरू करता येईल.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणAmericaअमेरिकाwarयुद्धDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू