शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
3
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
4
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
6
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
7
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
8
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
9
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
10
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
11
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
12
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
13
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
14
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
15
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
17
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
18
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
19
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे

'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 18:25 IST

Iran Israel War: शिया धर्मगुरू अयातुल्ला अली सिस्तानी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला युद्ध संपवण्यासाठी शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले.

Iran Israel War: इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगाचे लक्ष मध्यपूर्वेकडे लागले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धातइस्रायलची बाजू घेतली असून, इराणला बिनशर्त आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, अयातुल्ला अली खमेनी कुठे लपले आहेत, हे आम्हाला माहित आहे, असे सूचक विधानही अमेरिकेने केले आहे.

इराकचे अमेरिकेला प्रत्युत्तरन्यूज एजन्सी एफपीच्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराकचे सर्वोच्च शिया धर्मगुरू अयातुल्ला अली सिस्तानी यांनी अमेरिकेला प्रत्युत्तर दिले आहे. इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाला लक्ष्य केले, तर या प्रदेशात अराजकता पसरेल, गंभीर परिणाम भोगावे लागतील. यामुळे या प्रदेशातील लोकांच्या अडचणीही वाढतील गंभीर नुकसान होईल, असे सिस्तानी यांनी म्हटले. तसेच, त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला हे युद्ध संपवण्यासाठी आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहनदेखील केले.

इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?

अली सिस्तानी यांचे जगभरात अनुयायी अल-सिस्तानी हे शिया मुस्लिमांमधील सर्वोच्च धार्मिक नेत्यांपैकी एक मानले जातात. जगभरात त्यांचे अनुयायी असून, भारतातील बहुतांश शिया त्यांनाच आपला गुरू मानतात. सिस्तानी फार कमीवेळा माध्यमांसमोर येतात. २०१४ मध्ये त्यांनी इराकी लोकांना एकत्र येऊन आयसिसविरुद्ध त्यांच्या देशाचे रक्षण करण्याचे आवाहन केले होते. इराकमधील सद्दाम हुसेन यांच्या सरकारशीही त्यांचे संबंध चांगले नव्हते. बीबीसीच्या वृत्तानुसार, त्यांना बराच काळ घरात नजरकैदेत राहावे लागले. ते राजकारणापासूनही दूर राहतात. 

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणMuslimमुस्लीमwarयुद्धDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प