शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:24 IST

Iran Israel War News: इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा केंद्रांनाच लक्ष्य केले आहे. इराणमधील अरक शहराजवळ असलेल्या अणुऊर्जा केंद्रावरही क्षेपणास्त्र डागण्यात आले. 

इस्रायल आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस चिघळू लागला आहे. इस्रायलनेइराणमधील अणुऊर्जा केंद्र आणि लष्करी छावण्यांना लक्ष्य करत हल्ल्याची सुरूवात केली होती. यात आतापर्यंत इराणने अनेक महत्त्वाच्या पदावरील अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञ गमावले आहेत. इस्रायलने अरक शहराजवळ असलेल्या एका अणुऊर्जा केंद्रावरही आता हल्ले केले आहेत. त्यात झालेल्या नुकसानीबद्दल आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेने माहिती दिली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आयएईएने अर्थात आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेने इस्रायलच्या हल्ल्यात अणुऊर्जा केंद्राचे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे. 

अरक शहराजवळील इराणच्या अणुऊर्जा केंद्राच्या काही महत्त्वाच्या इमारतींचे नुकसान झाले आहे, असे या संस्थेने म्हटले आहे. 

वाचा >>इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गुरुवारी (१९ जून) अरक हेवी वॉटर रिअॅक्टरवर बॉम्ब वर्षाव केला होता. पण, या केंद्रावर कोणतीही अण्वस्त्र साहित्य नव्हते, अशी माहिती देण्यात आली. 

आयएईएचे प्रमुख राफेल ग्रोसी यांनी सांगितले की, इस्रायलच्या हल्ल्यांमुळे आतापर्यंत कोणतीही किरणोत्सर्ग झाल्याची घटना घडलेली नाही. पण, किरणोत्सर्ग होण्याचा धोका अजूनही कायम आहे.

ऑस्ट्रेलियाने उच्चायुक्तालयातील काम केले बंद

इस्रायलकडून होत असलेले हल्ले आणि इराणमधील ढासळत असलेली सुरक्षा व्यवस्था लक्षात घेत ऑस्ट्रेलियाने तेहरानमधील आपल्या उच्चायुक्तालयातील कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग यांनी सांगितले की, "सद्यस्थितीत आमचे उच्चायुक्तालयातील सेवा देण्याची क्षमता खूपच मर्यादित आहे. हवाई हद्द अजूनही बंद आहे. तेहरानमधील बिघडलेली परिस्थिती लक्षात घेऊन कामकाज थांबवण्यात येत आहे."

 ऑस्ट्रेलिया सरकारने तेहरान आणि इराणमधील आपल्या सर्व अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना इराण सोडण्याचे निर्देश दिले आहेत. उच्चायुक्तालयातील अधिकारी आता शेजारील देश अझरबैजानमध्ये काम करणार असल्याचे वोंग यांनी सांगितले. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध