शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 09:42 IST

Ayatollah Ali Khamenei Mahmoud Moradkhani, Iran Israel War: खामेनी राजवटीचा नाश करू शकणाऱ्या गोष्टींना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे, असेही तो म्हणाला.

Iran Israel War: इराण आणि इस्रायलमधीलयुद्ध दुसऱ्या आठवड्यातही सुरूच आहे. असे असताना, इराणचा शासक अयातुल्ला अली खामेनी ( Ayatollah Ali Khamenei ) याच्या कुटुंबातून एक आश्चर्यकारक प्रतिक्रिया आली आहे. खामेनी यांचा पुतण्या महमूद मोरादखानी ( Mahmoud Moradkhani )  हा फ्रान्समध्ये राहतो. त्याने एका मुलाखतीत म्हटले आहे की तो या युद्धाच्या बाजूने नाही. त्याचा या युद्धाला विरोध आहे. परंतु इस्लामिक रिपब्लिक शासनाचा अंत हाच खरा शांततेचा मार्ग आहे असे त्याचे म्हणणे आहे.

"खामेनी राजवटीचा नाश करू शकणाऱ्या गोष्टींना सध्या प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. आता आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत, त्यामुळे हे करायलाच हवे," असे म्हणत १९८६ मध्ये इराण सोडलेल्या मोरादखानीने त्याच्या काकांच्या हुकूमशाही राजवटीचा तीव्र शब्दात विरोध केला. मोरादखानीने रॉयटर्सला सांगितले की इस्रायलशी लष्करी संघर्ष दुर्दैवी आहे. परंतु ज्या हुकूमशाही व्यवस्थेत शासन झुकत नाही किंवा सुधारणा स्वीकारत नाही अशा देशावर (इराण) ही वेळ नाईलाजाने कधी ना कधी येणे अपरिहार्य आहे.

इस्लामिक राजवट संपली पाहिजे: मोरादखानी

मोरादखानी म्हणाला, "मला खूप वाईट वाटते की गोष्टी या टप्प्यावर आल्या आहेत. पण खामेनींच्या हत्येमुळे राजवट लगेच संपेल का? हा एक वेगळा प्रश्न आहे. इराणमध्ये इंटरनेट बंद असल्याने लोक आपल्या लोकांशी संपर्क साधू शकत नाही, परंतु लोकांना असा विश्वास आहे की बरेच इराणी लोक राजवटीच्या कमकुवतपणाची चिन्हे पाहून आनंदी झाली असतील. कारण अशा राजवटीत सारेच हतबल होतात. हे जितक्या लवकर संपेल तितके चांगले. ते इस्लामिक रिपब्लिकच्या अंताने संपले पाहिजे. अन्यथा हा एक निरुपयोगी पराभव असेल आणि मला अजूनही विश्वास आहे की इस्रायली राजवट निश्चितच बदला घेईल."

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध