तेहरान/जेरुसलेम : अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांमुळे इराण व इस्रायल या दोन्ही देशांच्या लष्करी क्षमतेचा मुद्दा चर्चेत आला आहे. पुढील मुद्द्यांवर दोन्ही देशांची लष्करी क्षमता लक्षात येईल.
ताज्या संघर्षाचे स्वरूप : इराणसाठी हे युद्ध केवळ इस्रायलपुरते मर्यादित राहिलेले नाही. इराण आपल्या ‘प्रॉक्सी’ संघटनांच्या (हिजबुल्ला, हमास) माध्यमातून इस्रायलवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, तर इस्रायल आणि अमेरिका थेट हवाई हल्ल्यांद्वारे इराणची लष्करी क्षमता मोडीत काढण्याचे उद्दिष्ट ठेवून आहेत.
इराण-इस्रायलचे संख्यात्मक बलतपशील इस्रायल इराणलोकसंख्या ९.६ दशलक्ष ८८.६ दशलक्ष जीडीपी ५२५ अब्ज ४१३ अब्ज दरडोई जीडीपी ५४,९३१ ४,६६९संरक्षण तरतूद बजेट १९ अब्ज ७.४ अब्ज
सैन्यसंख्या आणि ग्लोबल रँकिंग : ‘ग्लोबल फायरपॉवर’नुसार, इराण लष्करी ताकदीत जागतिक स्तरावर १४व्या क्रमांकावर आहे. तर इस्रायल १७ व्या क्रमांकावर आहे. इराणकडे सैनिक अधिक आहेत.
हवाई दल आणि तंत्रज्ञान : इस्रायलकडे रडारला चकवा देणारी अमेरिकन बनावटीची एफ-३५ अदिर ही विमाने आहेत. तर इराणची खरी ताकद आधुनिक युद्धतंत्र बदलणाऱ्या ‘शहीद’ ड्रोनमध्ये आहे,
क्षेपणास्त्रे आणि संरक्षणकवच : इराणकडे मध्यपूर्वेतील सर्वांत मोठा मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा साठा आहे. तर इस्रायलकडे ‘आर्यन डोम’ (लहान पल्ल्यासाठी) आणि ‘ॲरो-३’ ही संरक्षण प्रणाली आहे.
अण्वस्त्र सज्जता : इस्रायलने अधिकृतपणे कधीही कबुली दिली नसली तरी, त्यांच्याकडे साधारण ९० अणुबॉम्ब असल्याचे मानले जाते. इराणचा अणू कार्यक्रम प्रगत अवस्थेत असून, अमेरिकेने याच कारणास्तव इराणवर हल्ले करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
Web Summary : Iran-Israel military strength compared after recent clashes. Iran relies on proxies; Israel on air strikes. Israel leads in technology, Iran in missiles and manpower. Nuclear capability remains a key concern.
Web Summary : हालिया संघर्षों के बाद ईरान-इज़राइल की सैन्य शक्ति की तुलना। ईरान परोक्ष युद्ध पर निर्भर है; इज़राइल हवाई हमलों पर। इज़राइल प्रौद्योगिकी में आगे, ईरान मिसाइलों और जनशक्ति में। परमाणु क्षमता एक प्रमुख चिंता बनी हुई है।