शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मध्यपूर्वेत तणाव शिगेला; इराणकडून बहरीन, यूएई आणि कुवैतमधील अमेरिकन तळांवर मोठे हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 16:09 IST

Iran-Israel-America Crisis: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाने आणखी तीव्र रूप धारण केले आहे.

Iran-Israel-America Crisis: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाने आणखी तीव्र रूप धारण केले असून, आता इराणने ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस-4’ सुरू केले आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने जड क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या साहाय्याने संयुक्त अरब अमिरात, बहरीन आणि कुवैतमधील तीन अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे.

खार्ग बेटावर अमेरिकेचे मोठे हल्ले

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने इराणच्या खार्ग बेटावर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. या कारवाईत बेटावरील 90 पेक्षा जास्त लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, ज्यामध्ये नेव्हल माइन स्टोरेज, क्षेपणास्त्र बंकर आणि इतर अनेक लष्करी सुविधा समाविष्ट होत्या. अमेरिकेने मात्र तेलाशी संबंधित पायाभूत सुविधा जाणूनबुजून वाचवल्या, असेही सांगण्यात आले.

इराणच्या मेहर न्यूज एजन्सीनुसार, खार्ग बेटावरील परिस्थिती सध्या नियंत्रणात असून, हल्ल्यानंतर काही वेळातच बेटावरील एअर डिफेन्स सिस्टम पुन्हा सक्रिय करण्यात आली. इराणने दावा केला की, अमेरिकेचा हल्ला अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यात अपयशी ठरला.

इस्रायलचे हवाई हल्ले; दोन वरिष्ठ इराणी अधिकारी ठार

दरम्यान, इस्रायली डिफेन्स फोर्स (IDF) ने तेहरानवर केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या खातम अल-अनबिया इमर्जन्सी कमांडचे दोन वरिष्ठ अधिकारी अब्दोल्लाह जलाली-नसब आणि अमीर शरीअत ठार झाल्याची माहिती दिली. इस्रायलने गेल्या 24 तासांत इराणच्या पश्चिम आणि मध्य भागातील 200 हून अधिक पायाभूत ठिकाणांवर हल्ले केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यांमध्ये बॅलिस्टिक मिसाइल लॉन्चर, एअर डिफेन्स सिस्टम, लॉन्च पॅड आणि शस्त्रसाठा केंद्रे यांना लक्ष्य करण्यात आले. इस्रायलच्या म्हणण्यानुसार, या कारवाईचा उद्देश इराणची क्षेपणास्त्र क्षमता कमकुवत करणे हा आहे.

सौदी अरेबिया आणि UAE वर ड्रोन-मिसाइल हल्ले

युद्धाचा प्रभाव आता खाडीतील इतर देशांवरही दिसू लागला आहे. सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, शुक्रवारी रियाध आणि पूर्वेकडील भागात आलेले 10 ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले. संयुक्त अरब अमिरातमध्येही इराणकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. UAE च्या एअर डिफेन्स सिस्टमने या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन अडवले. विविध भागांत ऐकू येणारे मोठे आवाज हे एअर डिफेन्स सिस्टमने बॅलिस्टिक मिसाइल रोखल्याचे आणि फायटर जेट्सने ड्रोन इंटरसेप्ट केल्याचे असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

प्रदेशातील तणाव आणखी वाढला

सध्या युद्धात इराणकडून सातत्याने प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरू आहेत, तर अमेरिका आणि इस्रायल इराणमधील लष्करी ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करून हवाई कारवाया करत आहेत. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला जात आहे. रम्यान, या संघर्षामुळे तेलाच्या किंमतींमध्ये वाढ होत असून मध्यपूर्वेतील अस्थिरता अधिक वाढली आहे. सौदी अरेबिया आणि UAE सारखे खाडी देशही आता थेट या संघर्षाच्या प्रभावाखाली आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran attacks US bases; Middle East conflict intensifies.

Web Summary : Iran targeted US bases in UAE, Bahrain, Kuwait. US struck Kharg Island. Israel hit Tehran, killing Iranian officers. Saudi Arabia and UAE intercepted drones/missiles. Regional tensions escalate.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीWarयुद्धIranइराण