शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! इराण भारताला विकू पाहतोय महागड्या दराने कच्चे तेल; मोदी करणार का व्यवहार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 12:26 IST

Iran India Oil Deal: इराणकडून भारताला महागड्या दरात तेल विक्रीची ऑफर. अमेरिकेची निर्बंधातून ३० दिवसांची सवलत, पण ब्रेंट क्रूडपेक्षा इराणचे तेल महाग. वाचा पेमेंट अटी आणि इंधन संकटाचा अहवाल.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या कच्च्या तेलाच्या विक्रीला महिन्याची परवानगी दिली आहे. यानंतर जगाच्या नाड्या रोखणाऱ्या इराणने हीच संधी साधत भारताला महागड्या दराने कच्च्या तेलाची ऑफर दिली आहे. हे कच्चे तेल एवढे महाग आहे की अमेरिकेहून तेल मागविलेले परवडणार आहे. आता भारत काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक इंधन संकट गडद झाले असताना, अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने इराणवरील तेल निर्बंधांमध्ये ३० दिवसांची तात्पुरती सवलत दिली आहे. या सवलतीचा फायदा घेत इराणने भारताला कच्चे तेल आणि एलपीजी विक्रीचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, इराणचे ट्रेडर्स हे तेल आंतरराष्ट्रीय बेंचमार्क 'ब्रेंट क्रूड'पेक्षाही महाग विकत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

इराणच्या कडक अटी आणि वाढीव प्रीमियमरॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, इराणने भारतीय रिफायनरीजसमोर काही कठीण अटी ठेवल्या आहेत. इराणचे तेल ब्रेंट क्रूडच्या किमतीपेक्षा ६ ते ८ डॉलर प्रति बॅरल प्रीमियम (जादा दर) लावून ऑफर केले जात आहे. तेलवाहू जहाज (कार्गो) बंदरात पोहोचल्यानंतर अवघ्या ७ दिवसांच्या आत संपूर्ण पैसे भरावे लागणार आहेत. बहुतेक इराणी कंपन्या पेमेंट डॉलरमध्ये मागत आहेत, तर काही कंपन्या रुपयांमध्ये व्यवहार करण्यास तयार आहेत.

१९ एप्रिलपर्यंतचीच मुदतअमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांच्या मते, ही सवलत केवळ २० मार्चपर्यंत जहाजांवर लोड झालेल्या तेलासाठीच आहे आणि १९ एप्रिलपर्यंत ते तेल उतरवून घ्यावे लागणार आहे. भारताने मे २०१९ पासून इराणकडून तेल खरेदी केलेली नाही, मात्र सध्याच्या टंचाईमुळे भारत या ऑफरचा विचार करू शकतो.

SWIFT पेमेंटचा अडथळाभारतीय रिफायनरीज कोणत्याही व्यवहारापूर्वी पेमेंट सिस्टमबाबत साशंक आहेत. इराण आंतरराष्ट्रीय SWIFT (ग्लोबल बँकिंग मेसेजिंग नेटवर्क) सिस्टमच्या बाहेर असल्याने पैसे पाठवणे सुरक्षित आणि कायदेशीर असेल का, याची पडताळणी सध्या सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Offers Costly Oil to India; Will Modi Accept Deal?

Web Summary : Iran is offering India expensive crude oil despite US sanctions relief. The price is higher than US oil. India considers the offer due to global shortages, but payment complexities via SWIFT remain a hurdle.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणCrude Oilखनिज तेलNarendra Modiनरेंद्र मोदीFuel Crisisइंधन टंचाईFuel Hikeइंधन दरवाढLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाई