शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

ट्रम्प यांच्या दबावाने फरक पडणार नाही- रुहानी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 3:04 PM

तेहरान- अमेरिकेने इराणवर लादलेल्या बंधनांमुळे काहीही फरक पडणार नाही आपण या आर्थिक दबावाचा सामना करु असा विश्वास इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी व्यक्त केला आहे. इराणी चलनाच्या मूल्यामध्ये मोठी घसरण झाल्यावर इराणी व्यापाऱ्यांनी संसदेसमोर निदर्शने केली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशीच रुहानी यांनी आपले मत मांडले आहे.इराणबरोबर अनेक देशांनी सामंजस्य करार ...

तेहरान- अमेरिकेने इराणवर लादलेल्या बंधनांमुळे काहीही फरक पडणार नाही आपण या आर्थिक दबावाचा सामना करु असा विश्वास इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी व्यक्त केला आहे. इराणी चलनाच्या मूल्यामध्ये मोठी घसरण झाल्यावर इराणी व्यापाऱ्यांनी संसदेसमोर निदर्शने केली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशीच रुहानी यांनी आपले मत मांडले आहे.

इराणबरोबर अनेक देशांनी सामंजस्य करार केला होता. त्यातून डोनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अमेरिकेने इराणवर बंधने लादण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इराणची तेल निर्यात घसरण्याची शक्यता असून इराणचे चलनही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इराणी नागरिकांनी  रियालऐवजी अमेरिकन डॉलर्समध्ये करण्यास सुरुवात केली आहे. रियालचे मूल्य कोसळल्यावर तेहरानमधील व्यापाऱ्यांनी निदर्शने केली.

या परिस्थितीत रुहानी यांनी समोर येत आपल्या व्यापारास कोणताही धक्का पोहोचलेला नाही असे सांगत रियाल कोसळण्यामागे परदेशातील माध्यमे आहेत असे मत मांडले. कितीही वाईट वेळ आली तरी इराणी लोकांच्या मूलभूत गरजा भागवल्या जातील. आपल्याकडे भरपूर साखर, गहू आणि खाद्यतेल आहे. तसेच आपल्याकडे भरपूर परदेशी चलनाची गंगाजळी उपलब्ध असल्याचेही त्यांनी टीव्हीवरुन दिलेल्या भाषणात स्पष्ट केले.वस्तूंचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी इराण विविध मार्गांचा वापर करत आहे. 1300 वस्तूंच्या आयातीवरही बंदी घातली आहे.

टॅग्स :IranइराणPresidentराष्ट्राध्यक्ष