शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

इराणचा भूकंप नैसर्गिक आपत्ती की अणु चाचणी? युद्ध आणखी तीव्र होण्याच्या मार्गावर? संशय वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 16:38 IST

Iran Nuclear Test Or Earthquake: या युद्धाचे रूपांतर अणुयुद्धात होणार तर नाही ना, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Iran Nuclear Test Or Earthquake: इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धात आखातात अनेक आघाड्यांवर पसरलेले दिसून आले. इराणचे समर्थन असलेल्या हिजबोल्लाह व अन्य बंडखोर गटांनी इस्रायल, अरब राष्ट्रांतील अमेरिकेचे सैन्यतळावर क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायल व अमेरिकेने इराणवर भीषण तुफान बॉम्बफेक सुरूच ठेवली आहे. या संघर्षामुळे हजारो प्रवासी विविध देशांत अडकले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची हत्या आणि कोणत्याही 'एक्झिट प्लॅन'चा अभाव यामुळे हा संघर्ष लवकर संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. अद्यापही हल्ले सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच इराणमध्ये भूकंप झाल्याची माहिती मिळत आहे. हा भूकंप म्हणजे नक्की नैसर्गिक आपत्ती होती की, इराणने ऐन युद्धात अणु चाचणी केली, यावर आता शंका उपस्थित केली जात आहे. 

आधीच युद्धाच्या भीषण आगीत होरपळत असणाऱ्या इराणमध्ये आता भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इराणमधील 'गेराश' भागात ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने (USGS) दिली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू १० किलोमीटर जमिनीखाली होता. ज्या गेराश भागात हा भूकंपाचे धक्के जाणवले, ते ठिकाण दक्षिण इराणमधील महत्त्वाचे ऊर्जा प्रकल्प, बंदर आणि लष्करी तळांना जोडणाऱ्या एका महत्त्वाच्या कॉरिडॉरवर स्थित आहे. विशेष म्हणजे गचीन युरेनियम खाण या ठिकाणापासून साधारण १५०-१८० किलोमीटर अंतरावर आहे, जी इराणच्या युरेनियम स्त्रोतांपैकी एक महत्त्वाची खाण आहे. इराणचा 'बुशहर' हा अणुऊर्जा प्रकल्प देखील गेराशपासून २५०-३०० किलोमीटर अंतरावर नेऋत्तेला आहे. सुदैवाने, या भूकंपामुळे अणुकेंद्रांचे नुकसान झाल्याची किंवा किरणोत्सर्गाची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

५-मेगाटन चाचणी ६.९ तीव्रतेचा भूकंप निर्माण करू शकते

इराण भूकंपप्रवण क्षेत्रात येतो, त्यामुळे असे भूकंप सामान्य आहेत, असे मानले जाते. अणुचाचण्यांमुळे भूकंप होऊ शकतात, परंतु त्यांच्या लहरी आणि वैशिष्ट्ये नैसर्गिक भूकंपांपेक्षा वेगळी असतात. अणुस्फोटामुळे होणाऱ्या भूकंपाची तीव्रता त्याच्या शक्तीवर अवलंबून असते. म्हणजे ५-मेगाटन चाचणी ६.९ तीव्रतेचा भूकंप निर्माण करू शकते, परंतु हे चाचणीच्या खोलीवर अवलंबून असते, असे सांगितले जाते. अणुचाचण्यांमुळे ४.५ ते ७+ तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो. लहान चाचणी (१-५ किलोटन): ४.५–५.५, मध्यम (२०-५० किलोटन): ५.५–६.५,  मोठे (१ मेगाटन+): ६.५–७+

दरम्यान,  इराणने म्हटले आहे की, त्यांच्याकडे ४६० किलोग्रॅम ६० टक्के समृद्ध युरेनियम आहे, जे ११ अणुबॉम्ब बनवण्यासाठी पुरेसे आहे, असे अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी सांगितले होते होते. तसेच इराणच्या सर्वोच्च नेत्याचे जवळचे विश्वासू मोहम्मद-जवाद लारीजानी म्हणाले की, गरज पडल्यास इराण २४ तासांच्या आत लष्करी अणु क्षमता विकसित करू शकतो. एकंदरीत, इराणकडे शस्त्रास्त्रे असल्याने प्रादेशिक युद्धाचे रूपांतर अणुयुद्धात होऊ शकते, ज्यामुळे अमेरिका आणि इस्रायलला जिंकणे कठीण होईल, असा दावा काही मिडिया रिपोर्टमधून करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Earthquake: Natural Disaster or Nuclear Test? War Intensifies?

Web Summary : An earthquake in Iran raises suspicions of a nuclear test amid escalating tensions with the US and Israel. The quake struck near a key energy corridor and uranium mine, fueling concerns about regional conflict and potential nuclear escalation.
टॅग्स :nuclear warअणुयुद्धwarयुद्धIranइराणAmericaअमेरिकाIsraelइस्रायलEarthquakeभूकंप