Iran Conflict: अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर देशाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता अखेर या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. ज्येष्ठ धर्मगुरू अयतुल्लाह अलीरेझा अराफी यांची अंतरिम सुप्रीम लीडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इराणची सरकारी वृत्तसंस्था ISNA ने ही माहिती दिली.
अंतरिम परिषद सुप्रीम लीडरची कामे पाहणार
इराणच्या संविधानानुसार, नवीन सुप्रीम लीडर निवडला जाईपर्यंत संक्रमणकालीन (अंतरिम) नेतृत्व परिषद सर्वोच्च नेत्याची सर्व जबाबदारी सांभाळते. या परिषदेत राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन, मुख्य न्यायाधीश घोलाम-होसैन मोहसिनी-एजेई आणि गार्जियन कौन्सिलमधील एक धर्मगुरू यांचा समावेश असतो. आयतुल्लाह अराफी यांची या परिषदेत विधी तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, देश सध्या राजकीय संक्रमणाच्या टप्प्यात प्रवेश करत आहे.
लष्करी घडामोडी: IRGC नेतृत्वात बदल
मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी झालेल्या हल्ल्यांत इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे प्रमुख जनरल मोहम्मद पाकपोर हेदेखील ठार झाले. त्यानंतर अहमद वहीदी यांची IRGCचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती इराणी सरकारी माध्यमांनी दिली. वहीदी आता या प्रभावशाली लष्करी दलाचे नेतृत्व करतील.
कोण आहेत अयातुल्लाह अलीरेझा अराफी?
जन्म 1959, यझ्द (इराण) येथे झाला.
पदवी/सन्मान: अयातुल्लाह (शिया धर्मगुरूंमधील उच्च सन्मान)
पूर्व अनुभव:
अल-मुस्तफा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे माजी कुलपती
मेयबोद व क़ोम येथे जुम्म्याचे इमाम
2019 पासून गार्जियन कौन्सिलचे सदस्य
राजकीय-धार्मिक प्रभाव:
धार्मिक शिक्षण व्यवस्थेचे प्रमुख
सांस्कृतिक क्रांतीच्या उच्च परिषदेचे सदस्य
मदरसा व्यवस्थापनात दीर्घ अनुभव
आधुनिक तंत्रज्ञानाचे समर्थक
अराफी धार्मिक संस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरण्याच्या बाजूने आहेत. त्यांच्या मते, यामुळे इस्लामी सभ्यतेचा विकास वेगाने होऊ शकतो. 2015 मध्ये त्यांनी असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सची निवडणूक लढवली होती (पराभव), तर 2021 मध्ये ते सदस्य म्हणून निवडून आले.
Web Summary : Following Khamenei's reported death in a US-Israeli strike, Ayatollah Alireza Arafi is interim Supreme Leader. Iran's IRGC also sees new leadership with Ahmad Vahidi. Arafi, a religious scholar, advocates for technology in Islamic development.
Web Summary : अमेरिकी-इजरायली हमले में खामेनेई की कथित मौत के बाद, अयातुल्ला अलीरेज़ा अराफी अंतरिम सर्वोच्च नेता बने। ईरान के आईआरजीसी में भी अहमद वाहिदी के साथ नया नेतृत्व देखा गया। अराफी इस्लामी विकास में प्रौद्योगिकी की वकालत करते हैं।