शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मध्यपूर्वेतील तणाव शिगेला; इराणचा दुबईतील Amazon च्या डेटा सेंटरवर हल्ला? अनेक सेवा ठप्प...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 18:07 IST

Iran Conflict: डेटा सेंटर म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे आहेत? जाणून घ्या...

Iran Conflict: जगात कुठेही युद्ध झाले, तर सर्वात आधी प्रतिस्पर्धी देश एकमेकांच्या विमानतळ, तेल रिफायनरी आणि लष्करी तळांवर हल्ले करतात. मात्र, आजच्या आधुनिक जगात डेटा सेंटर्स हेदेखील ‘सॉफ्ट टार्गेट’ म्हणून पुढे येत आहेत. याचे कारण म्हणजे, डेटा सेंटरवर परिणाम झाला, तर त्याचे पडसाद जागतिक डिजिटल प्रणालीवर थेट उमटतात. मिळालेल्या माहितीनुसार, इराणने केलेल्या हल्ल्यात UAE मध्ये असलेल्या Amazon Web Services (AWS) च्या डेटा सेंटरचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

UAE आणि बहरीनमधील AWS सेवांवर परिणाम?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर, इराणकडून इस्रायलसह मध्यपूर्वेतील विविध देशांवर ड्रोन हल्ले केले जात आहेत. या वाढत्या तणावादरम्यान UAE आणि बहरीनमधील AWS डेटा सेंटर्समध्ये आग, वीजपुरवठा आणि कनेक्टिव्हिटी संदर्भातील अडचणी नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. काही क्लाउड कम्प्युटिंग आणि डेटाबेस सेवा बाधित झाल्याचेही समोर आले असून, Amazon कडून घटनेची पुष्टी करण्यात आली आहे. मात्र, ही घटना थेट हल्ल्यामुळे झाली की, अन्य तांत्रिक कारणांमुळे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

डेटा सेंटर म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे?

डेटा सेंटर म्हणजे अशी ठिकाणे जिथे हजारो सर्व्हर्स कार्यरत असतात. हेच सर्व्हर्स वेबसाइट्स आणि मोबाइल अ‍ॅप्स, बँकिंग व डिजिटल पेमेंट सिस्टम, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, सरकारी पोर्टल्स आणि मीडिया सेवा चालवतात. AWS सारख्या क्लाउड प्लॅटफॉर्मवर जगभरातील लाखो कंपन्यांचा डेटा आणि अ‍ॅप्लिकेशन्स होस्ट केलेले आहेत. त्यामुळे डेटा सेंटरमध्ये वीज खंडित झाली, नेटवर्क तुटले किंवा भौतिक नुकसान झाले, तर त्याचा थेट परिणाम ऑनलाइन सेवांवर दिसून येतो.

सेवा ठप्प झाल्यास काय परिणाम होऊ शकतात?

डेटा सेंटरमध्ये मोठी बिघाड किंवा हल्ला झाल्यास सर्व्हिस आउटेज होते. याचा अर्थ, वेबसाइट्स उघडणार नाहीत, अ‍ॅप्स लॉगिन होणार नाहीत, ऑनलाइन पेमेंट फेल होऊ शकतात, बँकिंग आणि इतर महत्त्वाच्या सेवा प्रभावित होतील, बँकिंग व्यवहार थांबू शकतात, एअरलाइन तिकीट बुकिंगमध्ये अडथळे आणि सरकारी डिजिटल सेवा स्लो किंवा बंद पडू शकतात.

बॅकअप असूनही धोका का?

मोठे क्लाउड प्रोव्हायडर्स एका डेटा सेंटरवर अवलंबून राहत नाहीत. ते वेगवेगळ्या शहरांमध्ये व देशांमध्ये अनेक रीजन तयार करतात. एका ठिकाणी अडचण आल्यास ट्रॅफिक दुसऱ्या रीजनकडे वळवतात. मात्र, मोठ्या प्रमाणावर हल्ला किंवा वीज अपयश झाल्यास रिकव्हरीसाठी वेळ लागू शकतो. युद्धकाळात ही वेळ अत्यंत महत्त्वाची ठरते.

डिजिटल इकॉनॉमीवर थेट परिणाम

तज्ज्ञांच्या मते, एखाद्या देशाच्या क्लाउड सिस्टमवर हल्ला झाल्यास त्याचा परिणाम तात्काळ अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. शेअर बाजार, पेमेंट गेटवे, लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन, मीडिया आणि कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म..अशा विविध क्षेत्रावर परिणाम पडू शकतो. यालाच “डिजिटल शॉक” असे संबोधले जाते.

सायबर हल्ला: आणखी मोठा धोका

फक्त बॉम्ब किंवा ड्रोनच नाही, तर सायबर हल्लेही तितकेच धोकादायक आहेत. हॅकिंग किंवा मालवेअरद्वारे, डेटा सेंटरचे कंट्रोल सिस्टम ठप्प करता येतात, कोणतीही भौतिक हानी न करता सेवा बंद पाडता येते. म्हणूनच क्लाउड कंपन्या फिजिकल सिक्युरिटी, बायोमेट्रिक अ‍ॅक्सेस, नेटवर्क मॉनिटरिंग, AI-आधारित सुरक्षा यंत्रणा...अशा अनेक स्तरांवरील सुरक्षेचा वापर करतात.

या घटनेमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, आजच्या काळात डेटा सेंटर्स हे तेल रिफायनरी किंवा विमानतळाइतकेच महत्त्वाचे आहेत. डेटा सेंटरवर परिणाम झाला, तर त्याचा फटका केवळ टेक कंपन्यांनाच नव्हे, तर सामान्य नागरिकांनाही बसतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Middle East Tensions Soar: Iran Attacks Amazon Data Center?

Web Summary : Amidst escalating Middle East tensions, reports suggest Iran may have targeted an Amazon Web Services data center in the UAE, potentially disrupting cloud services and impacting digital economies. Data centers are now critical infrastructure, vulnerable to physical and cyber attacks, with service outages causing widespread disruption.
टॅग्स :IranइराणAyatollah Ali Khameneiअयातुल्ला अली खामेनेईUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीamazonअ‍ॅमेझॉन