शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनचे विमान चुकून पडल्याची इराणची कबुली; इराण सरकारचे निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 06:36 IST

दोषींवर कडक कारवाई करा : युक्रेन

तेहरान : युक्रेनचे प्रवासी विमान चुकून पाडल्याची कबुली इराणने शनिवारी दिली आहे. हे विमान उड्डाण करीत असताना तेहरानजवळील लष्करी तळाच्या दिशेने अचानक वळल्याने ते पाडले गेले असावे, असेही इराणने म्हटले आहे.

तेहराननजिक बुधवारी युक्रेनचे विमान कोसळून १७६ प्रवासी ठार झाले होते. इराणचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांना बगदादजवळ ड्रोन हल्ला करून अमेरिकेने ठार केले. त्याचा बदला घेण्यासाठी इराणने अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यानंतर लगेचच युक्रेनचे विमान इराणमध्ये कोसळले. या सर्व घटनांनी मध्य पूर्वेमध्ये अत्यंत तणाव निर्माण झाला आहे.

युक्रेनचे विमान चुकून पाडल्याची कबुली इराणच्या लष्कराने दिल्यानंतर थोड्याच वेळात तशाच आशयाचे टष्ट्वीट त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी केले. युक्रेनचे प्रवासी विमान इराणने क्षेपणास्त्रांचा हल्ला करून पाडले, हे अमेरिका व इतर देशांनी पुराव्यानिशी याआधीच सिद्ध केले होते. मात्र, हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास इराण तयार होत नव्हता. मात्र, अखेर या कृत्याची कबुली देऊन हसन रुहानी यांनी सांगितले की, विमान दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या दुर्घटनेप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

आमच्या देशाचे विमान पाडणाऱ्या दोषी व्यक्तींवर इराणने कडक कारवाई करावी, अशी मागणी युक्रेनने केली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसदारांना इराणने भरपाई द्यावी, तसेच विमान पाडल्याबद्दल जाहीर माफी मागावी, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची इराणने चौकशी विनाविलंब पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले.इराणच्या हद्दीतील उड्डाणावर बंदी अमेरिकेकडून मागेइराणच्या हवाई हद्दीतून आपल्या विमानांना उड्डाण करण्यावर घातलेली बंदी अमेरिकेने शुक्रवारी मागे घेतली. असाच निर्णय भारत दोन दिवसांत घेण्याची शक्यता आहे. इराणचे कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने ठार केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळांवर हल्ला केला होता. तेहरान येथे युक्रेनचे प्रवासी विमान इराणने क्षेपणास्त्र डागून पाडले होते. सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराण, इराक, ओमान, पर्शियन आखाताच्या हवाई हद्दीतून आपल्या विमानांना उड्डाण करण्यास अमेरिकेच्या फेडरेशन एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने (एफएए) बंदी घातली होती. असाच निर्णय भारतानेही घेतला होता. एअर इंडियाची भारतातून युरोप, अमेरिकेला जाणारी विमाने गेले काही दिवस इराणची हवाई हद्द टाळून उड्डाण करत आहेत. त्यामुळे दिल्ली व मुंबईहून सुटलेल्या विमानांना इच्छित स्थळी पोहोचण्यास अनुक्रमे २० मिनिटे व ३० ते ४० मिनिटांचा उशीर होत आहे. मध्य पूर्वेतील तणाव लक्षात घेता खूप महत्त्वाचे काम नसल्यास इराकमध्ये सध्या जाऊ नये अशी सूचना भारताने आपल्या नागरिकांना केली होती. अमेरिका व इराणमधील तणाव आणखी न वाढल्यास इराणच्या हवाई हद्दीत आपल्या विमानांना उड्डाण करण्यावर घातलेली बंदी भारतही मागे घेण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या एफएएने घेतलेला एखादा निर्णय इतर देशांना बांधील नसतो. पण सुरक्षेच्या दृष्टीने या निर्णयाचे अनुकरण अन्य देशांकडून केले जाते. इराणच्या हवाई हद्दीतून आपल्या विमानांच्या उड्डाणांना बंदी करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतल्यावर तसाच निर्णय भारतानेही घेतला. इराणची हद्द वगळता बहरिन, दोहा, अबुधाबी, दुबई, शारजाह, मस्कत येथे अमेरिकेच्या विमानांची ये-जा सुरू होती.

टॅग्स :IranइराणAmericaअमेरिका