शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

इराणनं बंद केला 'तो' मार्ग तर पूर्ण जगात जाणवेल तेलाचा तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 5:53 PM

इराण आणि अमेरिकेदरम्यान तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

तेहरानः इराण आणि अमेरिकेदरम्यान तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियानंही त्यांच्या दोन तेलाच्या टँकरना टार्गेट करण्यात आल्याचं सांगितलं होतं. दुसरीकडे संयुक्त अरब अमिरातीनंही जहाजांवर हल्ला झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या दोन्ही देशांचा रोख हा साहजिकच इराणकडे आहे. परंतु इराणनं हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.अमेरिका आणि इराणदरम्यान जेव्हा जेव्हा वातावरण बिघडलं, तेव्हा तेव्हा इराणच्या समुद्र खाडीत गंभीर परिणाम झाले आहेत. ज्याचा प्रभाव पूर्ण जगावर जाणवला आहे. इराणनं आधीच इशारा दिला आहे की, जर अमेरिकेबरोबरचा तणाव आणखी वाढल्यास जगातली सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी इतर वाहतुकीसाठी बंद करून टाकेल. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराण वारंवार जोर देतो, कारण या सामुद्रधुनीमार्गे जगभरात तेलाचा पुरवठा होतो, ही वाहिनी बंद झाल्यास त्याचा सरळ सरळ प्रभाव तेल व्यापारावर पडणार आहे. जर इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यास जगभरात तेलासाठी हाहाकार माजेल. कारण सौदी अरब, UAE, कुवैत, कतार आणि इराणची जास्त करून तेल निर्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीद्वारे होते. आशियाच्या मध्य पूर्व भागातील इराणच्या आखाताला ओमानच्या आखातासोबत जोडणारी ही एक अरुंद सामुद्रधुनी आहे.इराणच्या आखाताला अरबी समुद्र व हिंदी महासागरासोबत जोडणारा हा एकमेव दुवा असून ही सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाच्या व मोक्याच्या सागरी स्थानांपैकी एक आहे. हिच्या उत्तरेस इराण तर दक्षिणेस संयुक्त अरब अमिराती व ओमान हे देश आहेत. जगातील एकूण खनिज तेल वाहतुकीच्या २० टक्के वाहतूक ह्या सामुद्रधुनीद्वारे होते व येथील जहाजांची वर्दळ व वाहतूक नियंत्रित करण्यासाठी शिस्तबद्ध मार्ग आखून देण्यात आले आहेत. ह्या सामुद्रधुनीच्या इराणजवळील स्थानामुळे अनेकदा इराण व अमेरिकेदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे दिवसाला कमीत कमी 15 मिलियन बॅरल्स तेलाचा पुरवठा होतो. जर ही सामुद्रधुनी बंद झाली, तर यूएस, यूकेसह अनेक देशांत तेलाचा तुटवडा भासेल. तेलाच्या किमती वाढतील. खाडी देशांतील संबंध बिघडतील. जर इराण आणि अमेरिकेचे संबंध आणखी बिघडले तर भारत आणि चीनच्या अडचणीही वाढणार आहेत. इराणकडून तेल आयात करण्यावर अमेरिकेनं भारताला सूट दिली असून, ती लवकरच संपणार आहे. तसेच ऊर्जा सुरक्षेसंबंधीची आव्हान निर्माण झालं आहे. त्यामुळेच भारत-चीनसह अनेक देशांतील अर्थव्यवस्था सुस्त पडल्या आहेत.  

टॅग्स :Iranइराण