पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 16:46 IST2026-04-06T16:46:20+5:302026-04-06T16:46:45+5:30

Iran Ceasefire News: युद्धविरामाबाबत कोणतीही चर्चा आमच्या राष्ट्रीय हितांच्या आधारेच होईल, अशी स्पष्ट भूमिका इराणने घेतली आहे.

Iran Ceasefire News: Iran rejects Pakistan's peace proposal; No compromise on national interests, Iran clarifies | पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...

पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...

Iran Ceasefire News: इराण, इस्रायल आणि अमेरिकेतील युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. मात्र, आता पाकिस्तानने तयार केलेला 15 सूत्रीय शांतता प्रस्ताव इराणने नाकारल्याचे समोर आले आहे. युद्धविरामाबाबत कोणतीही चर्चा इराणच्या राष्ट्रीय हितांच्या आधारेच होईल, अशी स्पष्ट भूमिका इराणने घेतली आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली.

पाकिस्तानचा प्रस्ताव काय होता?

मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानने अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांना एक मसुदा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावात 45 दिवसांचा युद्धविराम, होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणे आणि युद्ध संपवण्यासाठी चर्चेचा मार्ग...अशा मुद्द्यांचा समावेश होता. मात्र इराणने हा प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाई यांनी सांगितले की, इराणने मध्यस्थांमार्फत आपली भूमिका आणि अटी आधीच स्पष्ट केल्या आहेत.

दबावाखाली चर्चा होणार नाही

इराणने स्पष्टपणे सांगितले की, कोणत्याही दबावाखाली किंवा धमक्यांखाली ते चर्चा करणार नाहीत. इस्माईल बगाई म्हणाले, डेडलाइन देणे आणि युद्धाची धमकी देणे, हे चर्चेशी सुसंगत नाही. इराणच्या काही अटी आहेत, ज्या आमच्या राष्ट्रीय हितांवर आधारित आहेत. इराण आपल्या मागण्या स्पष्टपणे मांडत आहे, याचा अर्थ तडजोड नव्हे तर आत्मविश्वास आहे. अमेरिकेसाठी आमचे राजनैतिक उत्तर तयार आहे, योग्य वेळी त्याची घोषणा केली जाईल.

ट्रम्प यांची इराणला धमकी

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अप्रत्यक्षपणे धमकी दिली आहे. 5 एप्रिल 2026 रोजी ट्रम्प यांनी म्हटले की, मंगळवार (7 एप्रिल 2026) हा इराणमध्ये पावर प्लांट डे आणि ब्रिज डे असेल. याचा अर्थ इराणच्या वीज प्रकल्प आणि पुलांवर हल्ला होऊ शकतो, असा इशारा असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांनी असेही सांगितले की, अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या चर्चा सुरू असून 6 एप्रिल रोजी करार होण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडीवर साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title : ईरान ने पाकिस्तान का शांति प्रस्ताव ठुकराया, राष्ट्रीय हित सर्वोपरि

Web Summary : ईरान ने पाकिस्तान के 15-सूत्रीय शांति प्रस्ताव को खारिज कर दिया। ईरान ने कहा कि युद्धविराम पर कोई भी चर्चा राष्ट्रीय हितों के आधार पर ही होगी। ईरान दबाव में बातचीत नहीं करेगा। ट्रंप ने संभावित हमलों का संकेत दिया।

Web Title : Iran Rejects Pakistan's Peace Plan, Prioritizes National Interests

Web Summary : Iran dismissed Pakistan's 15-point peace proposal for the Iran-Israel conflict, emphasizing national interests as the basis for any ceasefire discussions. Iran won't negotiate under pressure. Trump hinted at potential strikes.