शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलची एअर डिफेन्स सिस्टीम कोसळली! इराणची क्षेपणास्त्रे आदळू लागली, यरुशलममध्ये हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 03:43 IST

Iran ballistic missile attack on Jerusalem: इराणच्या IRGC ने युएईमधील इस्रायलचे THAAD रडार नष्ट केले असून अमेरिकन इंधनवाहू नौकेवरही हल्ला केला आहे. यरुशलममध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पडल्याने मोठी हानी. वाचा युद्धाचे ताजे अपडेट्स.

तेहरान/यरुशलम: इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने दावा केला आहे की, त्यांनी संयुक्त अरब अमिरातीमधील 'अल-रुवैस' येथे तैनात असलेली इस्रायलची प्रगत 'THAAD' रडार यंत्रणा पूर्णपणे नष्ट केली आहे. याशिवाय, अरबी समुद्रात अमेरिकन नौदलाला इंधन पुरवणारी एक मोठी नौकाही इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात निकामी झाली आहे. इराणने मध्यरात्री इस्रायलव भीषण हवाई हल्ले सुरु केले असून इस्रायलची हवाई सुरक्षा यंत्रणा भेदण्यात यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 

इराणच्या एरोस्पेस फोर्सने डागलेल्या एका 'प्रिसिजन' (अचूक) क्षेपणास्त्राने युएईमधील इस्रायली क्षेपणास्त्र संरक्षण नेटवर्कचा मुख्य कणा असलेले THAAD रडार उडवून दिले आहे. यामुळे या भागातील इस्रायलची सुरक्षा कवच भेदली गेली आहे. यामुळे इराणची बहुतांश क्षेपणास्त्रे इस्रायलच्या राजधानीवर आदळू लागली असून इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणावर अॅम्बुलन्स धावताना आणि हवाई हल्ले होतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. एक इमारत कोसळल्याचेही सांगितले जात आहे.

अमेरिकन नौदलाला फटका

चाबहार किनारपट्टीपासून ७०० किलोमीटर अंतरावर अमेरिकन ताफ्याला इंधन पुरवणाऱ्या जहाजाला इराणने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले. हे जहाज आता पूर्णपणे निकामी झाले असून, इराणची 'अँटी-शिप' क्षेपणास्त्र यंत्रणा अजूनही अमेरिकन जहाजांचा पाठलाग करत आहे.

यरुशलममध्ये भीषण स्फोटइराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याने व्याप्त यरुशलम हादरले आहे. क्षेपणास्त्र कोसळल्यानंतर या भागात प्रचंड आग लागली असून इस्रायली वसाहतवाद्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. जखमींना वाचवण्यासाठी रुग्णवाहिका आणि बचाव पथकांची मोठी धावपळ सुरू आहे. यरुशलममधील हल्ल्यानंतर इस्रायली प्रशासनाकडून माहिती लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला जात आहे, तरीही तिथे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Israel's Air Defense Collapses; Iranian Missiles Strike, Havoc in Jerusalem

Web Summary : Iran claims to have destroyed Israel's THAAD radar system and crippled a US Navy vessel. Iranian missiles are reportedly hitting Jerusalem, causing explosions and panic. Casualties are feared amidst efforts to conceal information.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्धAmericaअमेरिका