इराणविरोधात अमेरिका आणि इस्राइलने सुरू केलेल्या युद्धाला आता दोन आठवडे उलटत आले आहेत. दरम्यान, इराणकडून जोरदार प्रतिहल्लेही होत असून, त्या मालिकेत आज इराणने ओमानमधील सललाह बंदरावर हल्ला केला. सललाह बंदरावर इराणी ड्रोन्सन्ही हाहाकार माजवला असून, या हल्ल्यात किमान तीन तेल साठवण करणाऱ्या टाक्यांमध्ये आग लागली आहे. या आगीमुळे तिथे साठवून ठेवलेल्या लाखो लीटर तेलामधून आगडोंब उसळत आहे. तसेच आकाशात काळ्या धुराचे ढग लोटत आहेत. या हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सललाह बंदराला रिकामं करण्यात आलं आहे.
ओमानमधील दक्षिण पूर्व भागात असलेलं सलालाह हे एक मोठं कंटेरन ट्रान्सशिपेंट हब आहे. गतवर्षी आधुनिकीकरण आणि यार्ड वाढवल्यानंतर याची ट्रान्सशिपमेंट फॅसिलिटी वाढवण्यात आली आहे. मात्र या हल्ल्यामुळे येथे खूप नुकसान झाल्याची शक्यता आहे.
ओमानच्या सललाह पोर्टवर आज झालेल्या हल्ल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या हल्ल्याकडे अमेरिका आणि इस्राइलकडून इराणवर झालेल्या हल्ल्यांना दिलेलं प्रत्युत्तर म्हणून पाहिलं जात आहे. तसेच इराण आखाती भागातील ऊर्जा आणि पायाभूत भागातील सुविधांना लक्ष्य करत आहे.
Web Summary : Iran attacked Oman's Salalah port amid escalating tensions with the US and Israel. Drones ignited oil tanks, causing massive fires and widespread damage. The port was evacuated as a precaution. This is seen as retaliation, targeting energy infrastructure.
Web Summary : ईरान ने अमेरिका और इजराइल के साथ बढ़ते तनाव के बीच ओमान के सलालाह बंदरगाह पर हमला किया। ड्रोन से तेल टैंकों में आग लग गई, जिससे भारी आग और व्यापक नुकसान हुआ। एहतियात के तौर पर बंदरगाह को खाली करा लिया गया। इसे ऊर्जा बुनियादी ढांचे को लक्षित करते हुए जवाबी कार्रवाई के रूप में देखा जा रहा है।