शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 17:20 IST

Iran Attack on Israel War: अमेरिकने इराणच्या अणू ठिकाण्यांवर हल्ले चढविल्यानंतर इस्रायलींना हायसे वाटलेले नाहीय, तर ते आणखी दहशतीखाली गेले आहेत.

दुसऱ्या देशांवर हल्ले करणाऱ्या आणि स्वत:ला आयर्न डोमच्या छत्रछायेखाली सुरक्षित ठेवणाऱ्या इस्रायलमध्ये आता लोक दहशतीखाली वावरू लागले आहेत. हमासची शेकडो मिसाईल इस्रायलमध्ये काही करू शकली नव्हती, परंतू दीड हजार किमीवरून काही मिनिटांत येणारी इराणची मिसाईल इस्रायलमध्ये धडकू लागली आहेत. यामुळे इस्रायलला जशास तसा ठोसा लगावणारा भेटला आहे. 

अमेरिकने इराणच्या अणू ठिकाण्यांवर हल्ले चढविल्यानंतर इस्रायलींना हायसे वाटलेले नाहीय, तर ते आणखी दहशतीखाली गेले आहेत. इराण आता चवताळून  आणखी भीषण हल्ले करण्याची भीती त्यांना सतावू लागली आहे. रात्र रात्रभर हे लोक झोपू शकले नाहीएत आणि सकाळी खरोखरच ही भीती देखील खरी ठरली आहे. गिलान चपेआ या इस्रायली नागरिकाने हे सांगितले आहे. 

इराणची मिसाईल त्याच्या घरापासून ३० मीटर अंतरावर आदळली. या स्फोटाचा आवाज एवढा जास्त होता की त्याने आधी कधी ऐकला नव्हता, असे गिलान यांनी म्हटले आहे. पोर्ट सिटी हाइफामध्ये गिलान राहतात. त्यांच्या या शहरावर इराणचा हल्ला झाला आहे. गिलान यांच्या पत्नीनुसार मिसाईल हल्ल्यापूर्वी ना कोणता सायरन वाजला ना अलर्ट आला. यापूर्वी असे कधीच झाले नव्हते. 

इस्रायलमध्ये हामासची मिसाईल पोहोचू न शकल्याने सायरन वाजला तरी लोक रस्त्यावर फिरताना किंवा घरातच पहुडलेले असायचे. परंतू आता सायरन वाजला की लगेचच सेफ हाऊसकडे पळताना दिसत आहेत. या लोकांना मिनीट, दीड मिनिटाचा वेळ असतो. परंतू, या हल्ल्यावेळी तो अलर्टही मिळाला नाही, असे वृत्त दैनिक भास्करने दिले आहे.   

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध