पश्चिम आशियातील युद्ध आता अधिकच भीषण वळणावर पोहोचले आहे. इराणने संयुक्त अरब अमिरातीमधील जगातील सर्वात व्यस्त असलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य करत क्षेपणास्त्र डागले आहे. या हल्ल्यात विमानतळाच्या एका भागाचे नुकसान झाले असून ४ कर्मचारी जखमी झाले आहेत.
दुबई मीडिया ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार, इराणने या भागात असलेल्या अमेरिकन तळांना लक्ष्य करण्यासाठी क्षेपणास्त्रे डागली होती, ज्यापैकी एक दुबई विमानतळाच्या 'कॉनकोर्स' परिसरात पडले. दुबई एअरपोर्ट्सने 'X' (ट्विटर) वर पोस्ट करून या घटनेची पुष्टी केली आहे. या घटनेत चार कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली आहे. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
प्रवाशांना हलवलेविमानतळावर आधीच 'इमर्जन्सी प्लॅन' लागू करण्यात आला होता, त्यामुळे अनेक टर्मिनल्स रिकामे करून घेण्यात आले होते. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सध्या आपत्कालीन पथके परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम करत आहेत.
उड्डाणे ठप्पया हल्ल्यानंतर दुबई विमानतळावरील सर्व उड्डाणे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत. हजारो भारतीय प्रवासी आणि सोनल चौहान, पी.व्ही. सिंधू सारख्या सेलिब्रिटी आधीच येथे अडकल्या असताना या हल्ल्याने भीती वाढवली आहे.
Web Summary : An Iranian missile struck Dubai International Airport, injuring four staff. Flights suspended indefinitely. Passengers panicked. Evacuations occurred due to emergency plans. The attack targeted U.S. bases, impacting the concourse area. Situation under control; rescue efforts underway.
Web Summary : ईरान ने दुबई अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर मिसाइल हमला किया, जिसमें चार कर्मचारी घायल हो गए। उड़ानें अनिश्चित काल के लिए निलंबित कर दी गईं। यात्रियों में दहशत। आपातकालीन योजनाओं के कारण निकासी हुई। हमले में अमेरिकी ठिकानों को निशाना बनाया गया, जिससे कॉनकोर्स क्षेत्र प्रभावित हुआ। स्थिति नियंत्रण में।