शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

इराण आक्रमक : दुबई विमानतळ, तेलवाहू जहाजांवर तीव्र ड्रोन हल्ले; ४ जखमी, विमान उड्डाणे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 05:28 IST

जागतिक तेलपुरवठा, आर्थिक बाजारपेठेत खळबळ 

दुबई : इराणने बुधवारी पर्शियन आखातातील व्यापारी जहाजांसह दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य केले आहे. अमेरिका आणि इस्रायलनेइराणवर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यांनंतर इराणने हे आक्रमक पाऊल उचलल्याने जागतिक तेलपुरवठा आणि आर्थिक बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इराणने दोन ड्रोनद्वारे हल्ले केले. या हल्ल्यात चाैघेजण जखमी झाले असले, तरी विमान उड्डाणे सुरू असल्याचे दुबई मीडिया ऑफिसने स्पष्ट केले आहे.

बँकांना लक्ष्य करण्याची धमकी

इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने मध्यपूर्वेतील बँका आणि वित्तीय संस्थांना लक्ष्य करणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे दुबईसह सौदी अरेबिया व बहरीनमधील आंतरराष्ट्रीय बँकिंग व्यवहारांना धोका निर्माण झाला आहे.

जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ले

इराणने ओमानच्या किनारपट्टीवर थायलंडच्या ‘मयूरी नारी’ या मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला केला, ज्यात २० कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले असून तिघेजण अद्याप बेपत्ता आहेत. कुवेतने इराणचे आठ ड्रोन पाडले आहेत, तर सौदी अरेबियाने आपल्या ‘शयबाह’ तेलक्षेत्राकडे येणारी पाच ड्रोन नष्ट केली आहेत. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी २० टक्के वाटा ज्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’तून जातो, त्या पाच मार्गांवरील वाहतूक इराणने प्रभावीपणे रोखून धरली आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

इस्रायलचेही हल्ले सुरूच

दुसरीकडे, इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर सलग हवाई हल्ले सुरू ठेवले आहेत. लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या तळांना लक्ष्य करताना इस्रायलने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बैरुतमध्ये झालेल्या ताज्या हल्ल्यात एका इमारतीला आग लागली असून, त्यात १४ जणांचा बळी गेला आहे. 

शहीद कमांडरवर अंत्यसंस्कार

इराणमध्ये २८ फेब्रुवारी रोजी इस्रायली हल्ल्यात मारले गेलेले लष्करी प्रमुख ले. जनरल अब्दुलराहीम मौसवी आणि रिव्होल्युशनरी गार्डचे नेते ले. जनरल मोहम्मद पाकपूर यांच्यावर बुधवारी तेहरानच्या ‘एन्केलाब स्क्वेअर’वर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधीवेळी शहरावर इस्रायली विमाने घिरट्या घालत असतानाही हजारो इराणी नागरिक रस्त्यावर उतरले होते.

लेबनॉनमध्ये आतापर्यंत ७ लाख ८० हजार लोक विस्थापित झाले असून, १ लाख २० हजार नागरिक आश्रय छावण्यांमध्ये राहत आहेत. ताज्या हल्ल्यात १४ जणांचा बळी गेला आहे. 

इराणची १६ ‘माइनलेयर्स’ नष्ट 

अमेरिकन सैन्याने मंगळवारी सांगितले की, त्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इराणची १६ ‘माइनलेयर्स’ (पाण्याखाली सुरुंग पेरणी करणारी जहाजे) नष्ट केली आहेत, तरीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, इराणने या मार्गावर सुरुंग पेरल्याचे अद्याप वृत्त नाही. 

युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघात ठराव  

युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बुधवारी एक महत्त्वपूर्ण ठराव मांडला जाणार आहे. इराणने आपल्या शेजारील अरब राष्ट्रांवर केलेले हल्ले त्वरित थांबवावेत, अशी मागणी या ठरावात केली आहे.  सागरी व्यापार मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी व जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होण्यापासून वाचवण्यासाठी युद्ध थांबवणे आवश्यक असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलWarयुद्धUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरFuel Crisisइंधन टंचाईLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाई