संपूर्ण युरोपवर हल्ल्याचा कट
By Admin | Updated: December 20, 2015 00:01 IST2015-12-20T00:01:59+5:302015-12-20T00:01:59+5:30
‘इसिस’ ही दहशतवादी संघटना संपूर्ण युरोपवर एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा कट रचत असल्याचा दावा या संघटनेशी संबंधित एका माजी दहशतवाद्याने केला आहे.

संपूर्ण युरोपवर हल्ल्याचा कट
लंडन : ‘इसिस’ ही दहशतवादी संघटना संपूर्ण युरोपवर एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा कट रचत असल्याचा दावा या संघटनेशी संबंधित एका माजी दहशतवाद्याने केला आहे.
‘डेली एक्स्प्रेस’ या दैनिकात याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ‘इसिस’मधून बाहेर पडलेल्या हॅरी एस या अतिरेक्याने हा गौप्यस्फोट केल्याचे या वृत्तात म्हटले आहे. त्याची सध्या जर्मनीचे अधिकारी चौकशी करीत आहेत. या जर्मन अतिरेक्याने सिरियात तीन महिन्यांपर्यंत शिरच्छेद करण्याच्या घटनेचा तपशील दिला आहे. त्या घटना पाहून आपण हादरलो. त्या पाहू शकलो नाही म्हणून तेथून पलायन केल्याचे त्याने सांगितले.
तो म्हणाला की, युरोपात अनेक देशांमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्याचा त्यांचा कट आहे. आपण सिरियात नरसंहाराचे नेतृत्व करीत होतो आणि रक्का या शहरात साप्ताहिक वैचारिक प्रशिक्षण घेत होतो, अशी कबुली त्याने दिली आहे. मेमध्ये एका व्हिडिओत त्याला अन्य एका जर्मन भाषिक अतिरेक्यासमोर ‘इसिस’चा झेंडा घेऊन उभे असल्याचे दाखविण्यात आले होते. (वृत्तसंस्था)