शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
3
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
5
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
6
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
7
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
8
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
9
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
10
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
11
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
12
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
13
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
14
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
15
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
16
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
17
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
18
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
19
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
20
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली

लैंगिक संबंधांमुळेही जिकाची लागण

By admin | Updated: February 4, 2016 03:04 IST

लैंगिक संबंधांमुळे जिका विषाणू पसरले असल्याचे अमेरिकेच्या ज्येष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. लहान मुलांमध्ये बळावत असलेला हा आजार आणखी पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मियामी : लैंगिक संबंधांमुळे जिका विषाणू पसरले असल्याचे अमेरिकेच्या ज्येष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. लहान मुलांमध्ये बळावत असलेला हा आजार आणखी पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.टेक्सासच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी लॅटिन अमेरिकेत हा भयंकर आजार पसरण्याची भीती व्यक्त केली आहे. आमच्या जवळ या भीतीचे ठोस पुरावे आहेत. हा विषाणू केवळ उष्णकटिबंधीय डासांमुळेच नाही, तर लैंगिक संबंधांमुळेही पसरतो. अमेरिका, कॅनडा आणि युरोपसाठी हा धोक्याचा इशारा आहे. ज्या भागात जिकाची लागण झाली आहे तेथील दौरा करून आलेल्यांचा अमेरिका, युरोप व कॅनडामध्ये संचार आहे.डल्लास प्रांताने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी जिकाची लागण झालेल्या देशाचा प्रवास करून आलेल्या आजारी व्यक्तीशी ज्याचे लैंगिक संबंध आले त्यालाही त्याची लागण झाली. व्हेनेझुएलाहून आलेल्या कोणा व्यक्तीमध्ये जिकाचा विषाणू आढळला. जिकाची दुसरी घटनाही व्हेनेझुएलाहून आलेल्या व्यक्तीशीच संबंधित आहे. युएस सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे संचालक डॉ. टॉम फ्रिडेन यांनी जिकाची लागण टेक्सासमध्ये लैंगिक संबंधांतून झाल्याची माहिती ई-मेलद्वारे दिली. जिकाचे पहिले प्रकरण १९४७ मध्ये युगांडामध्ये समोर आले होते. याची लक्षणे म्हणजे हलका फ्लू आणि ताप अशी आहेत. गेल्या वर्षी लॅटिन अमेरिकन देश विशेषत: ब्राझीलमध्ये त्याचा फैलाव वेगाने होत आहे व त्यामुळे छोट्या डोक्याच्या मुलांचा जन्म होत आहे. (वृत्तसंस्था)1 वॉशिंग्टन : मानवी आरोग्याच्या दृष्टीने अवघ्या जगाची काळजी वाढविणाऱ्या ‘जिका’ या घातक विषाणूने अमेरिकेसह जगभरातील २३ देशांत हातपाय पसरले आहेत. एवढ्या झपाट्याने जिका या विषाणूचा फैलाव कसा झाला? याचा छडा लावणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते, उच्च तापमानामुळे डासांमार्फत जिका या विषाणूंनी एवढ्या झपाट्याने अनेक देशांना विळखा घातला आहे.2 शास्त्रज्ञ म्हणतात की, वाढते तापमान आणि एडिस इजिप्ती डासाच्या जीवनचक्राचा निकटचा संबंध आहे. उच्च तापमानामुळे या डासांमार्फत जिका विषाणंंूचा झपाट्याने प्रसार आणि प्रादुर्भाव होतो, असे युनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफोर्निया डेव्हिसचे कीटकशास्त्रज्ञ बिल रेईज यांनी सांगितले. ४ हजार जणांना लागण४ब्रासिलिया : डासामधील ‘जिका’ या विषाणूची ब्राझीलमध्ये ४ हजार लोकांना लागण झाली आहे. ४,७८३ जणांना या विषाणूची लागण झाल्याचा संशय होता. त्यापैकी ७०९ प्रकरणे नकारात्मक निघाली.