Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 10:36 IST2025-06-28T10:30:49+5:302025-06-28T10:36:29+5:30
Philippines Earthquake News: फिलीपिन्सच्या मिंडानाओ भागात आज पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
फिलीपिन्सच्या मिंडानाओ भागात सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.० रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भारतीय वेळेनुसार, हा भूकंप आज पहाटे ४.३७ वाजता झाला. सध्या कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. परंतु, भूकंपाची तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला.
एनसीएसने त्यांच्या एक्स हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार,'फिलीपिन्सच्या मिंडानाओ आणि आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. सध्या कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. परंतु, भूकंपाच्या धक्क्याने लोक घाबरली आणि घराबाहेर पडली.' फिलीपिन्स भौगोलिकदृष्ट्या रिंग ऑफ फायरमध्ये स्थित आहे, त्यामुळे तिथे भूकंप आणि ज्वालामुखीसारख्या घटना नेहमीच घडत राहतात. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती निवारण संस्था परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
Earthquake of magnitude 6.0 jolts Philippines
— ANI Digital (@ani_digital) June 28, 2025
Read @ANI Story | https://t.co/OVTY1uPUN6#Earthquake#Philippinespic.twitter.com/FFJN6k27RQ
अल्बेनियामध्ये गेल्या पाच दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. पाच दिवसांत तीन भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये मनात भिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत कोणत्याही जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. परंतु, वारंवार होणाऱ्या भूकंपांमुळे स्थानिक लोक सावध झाले आहेत.