कुलभूषण जाधव यांचा जीव घेण्यासाठी पाकिस्तान इरेला पेटलाय, हरिश साळवेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 06:17 PM2019-02-18T18:17:41+5:302019-02-18T18:34:39+5:30

कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयीन लवादासमोर आजपासून सुनावणी सुरू झाली आहे.

International Court of Justice (ICJ) starts public hearing Kulbhushan Jadhav case | कुलभूषण जाधव यांचा जीव घेण्यासाठी पाकिस्तान इरेला पेटलाय, हरिश साळवेंचा घणाघात

कुलभूषण जाधव यांचा जीव घेण्यासाठी पाकिस्तान इरेला पेटलाय, हरिश साळवेंचा घणाघात

Next

द हेग - कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयीन लवादासमोर आजपासून सुनावणी सुरू झाली आहे. आज  झालेल्या सुनावणीवेळी दीपक मित्तल आणि ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी भारताची बाजू मांडली. यावेळी यांनी कुलभूषण जादव प्रकरणात पाकिस्तानने केलेल्या खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला. तसेच पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले असून, तब्बल 13 वेळी विनंती करूनही कुलभूष जाधव यांना कौन्सिलर अॅक्सेस दिलेला नाही. कुलभूषण जाधव हे निर्दोष आहेत, मात्र पाकिस्तान त्यांना फसवून आपला अजेंडा पुढे रेटू पाहत आहे, असा आरोपही साळवे यांनी केला.  

कुलभूषण जाधव प्रकरणात भारताकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयात बाजू मांडताना दीपक मित्तल म्हणाले की, याआधी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे सव्वाशे कोटी भारतीयांच्या मनात अपेक्षा निर्माण झाली होती. पाकिस्तान एका निर्दोष भारतीयाच्या अधिकारांची गळचेपी करत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या आदेशांचेही व्यवस्थित पालन करत नाही आहे, असा आरोपही मित्तल यांनी केला.  



 



 



 

Web Title: International Court of Justice (ICJ) starts public hearing Kulbhushan Jadhav case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.