क्षणार्धात पाण्याच्या वेगवान प्रवाहात उद्ध्वस्त झालं ब्रिज, लोक पाचोळ्यासारखे गेले वाहून  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 11:07 PM2022-01-15T23:07:55+5:302022-01-15T23:10:48+5:30

bridge collapsed : सोशल मीडियावर दरदिवसी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडीओ हे गमतीदार असतात. मात्र काही व्हिडीओ पाहून लोख खूप घाबरतात. असाच एक भयानक व्हीडीओ समोर आला आहे.

In an instant, the bridge collapsed in the rapid flow of water, carrying people away like pacholya | क्षणार्धात पाण्याच्या वेगवान प्रवाहात उद्ध्वस्त झालं ब्रिज, लोक पाचोळ्यासारखे गेले वाहून  

क्षणार्धात पाण्याच्या वेगवान प्रवाहात उद्ध्वस्त झालं ब्रिज, लोक पाचोळ्यासारखे गेले वाहून  

Next

रियो दी जानिरो - सोशल मीडियावर दरदिवसी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडीओ हे गमतीदार असतात. मात्र काही व्हिडीओ पाहून लोख खूप घाबरतात. असाच एक भयानक व्हीडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ ब्राझीलमधून समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बघता बघता एक ब्रिज पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून जाताना दिसत आहे.

संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. तसेच हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एवढा भयावह आहे की, अनेकांचा हा व्हिडीओ पाहून थरकाप उडाला आहे. या व्हिडीओमध्ये शहराच्या मध्यवर्ती भागात नदीवरील एक पूल दिसत आहे. तसेच कुठल्याही अघटीताची कल्पना नसलेले लोक त्या पुलावरून ये जा करत आहेत. थोड्याच वेळात तिथे एक भयावह दु्र्घटना होणार आहे, याची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती.

लोकांची ये-जा सुरू असतानाच ब्रिज अचानक तुटला आणि त्यावरून जाणारे लोक काही सेकंदामध्ये पाण्यात वाहून गेले. तसेच हा संपूर्ण ब्रिजही पाण्याच्या वेगवान प्रवाहामध्ये वाहून गेला. या ब्रिजच्या शेजारी कारजवळ उभी असलेली व्यक्तीही घाबरून एका बाजूला गेला. मात्र पाण्याच्या प्रवाह एवढा वेगवान होता की, त्या प्रवाहात हा माणू वाहून गेला. मात्र त्याला वाचवण्याची कुणाचीही हिंमत झाली नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. memewalanews  नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.  

Web Title: In an instant, the bridge collapsed in the rapid flow of water, carrying people away like pacholya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app