तरुण दिसत असल्यामुळे तिची तुर्कीतील पासपोर्ट कार्यालयाने केली चौकशी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:50 IST2017-09-26T01:50:01+5:302017-09-26T01:50:16+5:30

प्रसिद्ध गायिका नतालिया झेनकिव्ह (४१) ही तिच्या मूळ वयापेक्षा खूपच तरुण दिसत असल्यामुळे नुकतेच तिला तुर्कीत पासपोर्ट कार्यालयाने अडवून तिची चौकशी केली.

The inquiry was done by the passport office in Turkey, because of her appearance | तरुण दिसत असल्यामुळे तिची तुर्कीतील पासपोर्ट कार्यालयाने केली चौकशी 

तरुण दिसत असल्यामुळे तिची तुर्कीतील पासपोर्ट कार्यालयाने केली चौकशी 

प्रसिद्ध गायिका नतालिया झेनकिव्ह (४१) ही तिच्या मूळ वयापेक्षा खूपच तरुण दिसत असल्यामुळे नुकतेच तिला तुर्कीत पासपोर्ट कार्यालयाने अडवून तिची चौकशी केली. अधिकाºयांना ती एवढी तरुण दिसली की ती इतर कोणाचा पासपोर्ट वापरत असल्याचा संशय आला. नतालिया तिच्या वयापेक्षा किती तरी तरुण आणि छान दिसते. परंतु हेच तिचे दिसणे तिला त्रासदायक ठरले. अधिकाºयांना वाटले ती २१ वर्षांची असून ती वयस्कर व्यक्तीचा पासपोर्ट वापरत असावी. नतालिया ही लामा या नावानेही प्रसिद्ध आहे. ती म्हणाली, ‘‘मला का अटक करण्यात आली याचे कारण समजले तेव्हा मला हसूच आले. माझ्या पासपोर्टवर माझे वय नमूद होतेच. मी जशी दिसते त्याबद्दल माझे नेहमीच कौतुक होत असते, परंतु हेच वयाचे कारण मला स्थानबद्ध करण्याला कारण ठरू शकते याची मी कल्पनाही केली नव्हती.’’ स्वत: नतालियाला तिच्या वयाचा दाखला द्यायची वेळ आली, परंतु तिचे चाहतेच तिच्या मदतीला धावले. त्यांनी तिला ओळखले. शिवाय उपस्थित लोकांतीलही अनेकांनी तिला स्वाक्षरी मागितली व तिच्यासोबत सेल्फी काढण्याबद्दलही विचारले. नंतर तिला जाऊ दिले गेले. नतालिया तिच्या वयापेक्षाही तरुण, उत्साही व छान दिसण्याचे रहस्य काय याबद्दल तिचा चाहता ओलेग पेट्रोव्ह म्हणाला, ‘‘नतालिया शाकाहारी असून ती फक्त फळे आणि भाज्या खाते त्यामुळेच ती छान दिसते.’’

Web Title: The inquiry was done by the passport office in Turkey, because of her appearance