शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

इमिग्रेशन नियमांचे उल्लंघन : अमेरिकेत 600 भारतीय विद्यार्थ्यांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 17:48 IST

इमिग्रेशन नियमांचे उल्लंघन केल्याच्या कथित आरोपाखाली अमेरिकेमध्ये सुमारे 600 भारतीय विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देइमिग्रेशन नियमांचे उल्लंघन केल्याच्या कथित आरोपाखाली अमेरिकेमध्ये सुमारे 600 भारतीय विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलेअमेरिकन तेलुगू असोसिएशन (एटीए) ने दिलेल्या माहितीनुसार यूएस इमिग्रेशन आणि कस्ट्म्स एन्फोर्समेंट एजन्सीने टाकलेल्या धाडीमध्ये या भारतीय विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलेहोमलँड सिक्यॉरिटी डिपार्टमेंट, यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्सने देशभरामध्ये परदेशी विद्यार्थ्यांविरोधात कारवाई केली

वॉशिंग्टन -  इमिग्रेशन नियमांचे उल्लंघन केल्याच्या कथित आरोपाखाली अमेरिकेमध्ये सुमारे 600 भारतीय विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अमेरिकन तेलुगू असोसिएशन (एटीए) ने दिलेल्या माहितीनुसार यूएस इमिग्रेशन आणि कस्ट्म्स एन्फोर्समेंट एजन्सीने टाकलेल्या धाडीमध्ये या भारतीय विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. एटीएने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे की, होमलँड सिक्यॉरिटी डिपार्टमेंट, यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्सने देशभरामध्ये परदेशी विद्यार्थ्यांविरोधात कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान तेलुगू विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणावर अटक करण्यात आली आहे. परवानगीशिवाय देशात वास्तव्य करत असलेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करून अमेरिकी एजन्सींनी ही कारवाई केली आहे. होमलँड सिक्यॉरिटी डिपार्टमेंटने सांगितले की, त्यांनी अवैधरीत्या राहत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना पकडण्यासाठी फर्मिंग्टन हिल्स येथे बनावट विद्यापीठ सुरू केले होते.  अमेरिकन तेलुगू असोसिएशनने भारतीय राजदूत हर्षवर्धन सिंगला आणि अटलांटा येथील कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडिया स्वाती विजय कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांना या प्रकाराची माहिती दिली आहे. आता भारतीय राजदूत आणि कॉन्सुलेट जनरल प्रशासनासोबत मिळून यासंदर्भात अधिक माहिती घेत आहे. आता 31 जानेवारी रोजी एटीए एक वेबिनार आयोजित करणार आहे. यादरम्यान विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे.  

टॅग्स :Studentविद्यार्थीUnited StatesअमेरिकाIndiaभारतEducationशिक्षण