शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

इंडोनेशिया : समुद्रातून मिळाले मानवी अवशेष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 04:52 IST

विमानाचे मुख्य वैमानिक भव्य सुनेजा हे भारतीय होते आणि दिल्लीच्या मयूरविहार भागातील रहिवासी होते.

जकार्ता/ नवी दिल्ली : इंडोनेशियात लायन एअरचे विमान समुद्रात कोसळून १८९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याप्रकरणी नागरी विमान महासंचालकांनी (डीजीसीए) बोइंग आणि अमेरिकेतील फेडरल अ‍ॅव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनकडे माहिती मागितली आहे. या विमानाचे मुख्य वैमानिक भव्य सुनेजा हे भारतीय होते आणि दिल्लीच्या मयूरविहार भागातील रहिवासी होते.ज्या प्रकारचे लायन एअरचे विमान सोमवारी कोसळले, तशाच प्रकारची विमाने जेट एअरवेज आणि स्पाइसजेट या दोन कंपन्यांनीही घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ही विमाने कितपत सुरक्षित आहेत, हे पुन्हा एकवार तपासण्याचे डीजीसीएने ठरविले आहे. या दोन कंपन्यांनी बोइंगकडे याआधीच या विमानांची आॅर्डर दिली आहे. विमानाने जकार्तातून उड्डाण केल्यानंतर १३ मिनिटांतच विमान समुद्रात कोसळले. तत्पूर्वी विमान तीन हजार फूट उंचीवर होते. इंडोनेशियातील तपास पथकाला समुद्रातून मंगळवारी मानवी अवशेष मिळाले. एका अहवालात म्हटले आहे की, विमानात एक दिवसापूर्वी तांत्रिक समस्या आली होती. (वृत्तसंस्था)डीएनए चाचणी होणारतपास पथकाचे प्रमुख मोहम्मद यांनी सांगितले की, घटनास्थळाहून मानवी अवशेष मिळाले असून, या दहा बॅगमधील अवशेषांची डीएनए चाचणी करण्यात येईल. कपडे, बूट, पर्स अशा वस्तूही सापडल्या आहेत. समुद्रावर तरंगणाऱ्या सर्व वस्तू एकत्र करण्यात आल्या आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या विमानात १७८ वयस्क, एक मुलगा, दोन बालके, दोन पायलट आणि चालक दलाचे सहा सदस्य होते. यात इंडोनेशिया अर्थ मंत्रालयाचे २० कर्मचारीही होते.

टॅग्स :IndonesiaइंडोनेशियाAccidentअपघातairplaneविमान