भारत-नेपाळ द्विपक्षीय संबंधांचे नवे पर्व
By Admin | Updated: August 4, 2014 02:09 IST2014-08-04T02:09:05+5:302014-08-04T02:09:05+5:30
नेपाळच्या पहिल्याच भेटीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला

भारत-नेपाळ द्विपक्षीय संबंधांचे नवे पर्व
काठमांडू : नेपाळच्या पहिल्याच भेटीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांच्याशी व्यापार, गुंतवणूक, जलविद्युत आणि कृषी क्षेत्र यासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. एवढेच नाही, तर उभय नेत्यांच्या साक्षीने तीन महत्त्वपूर्ण करारही करण्यात आले. दोन्ही नेत्यांत पंचतारांकित हॉटेलात झालेल्या तासभराच्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली.
नेपाळला आयोडिनयुक्त मिठाचा पुरवठा करण्यासाठी ६.९० कोटी नेपाळी रुपयांचे अनुदान देण्यासंबंधीच्या कराराचा यात समावेश आहे.भव्य स्वागत...तत्पूर्वी, दोन दिवसांच्या नेपाळ भेटीवर आलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला राजशिष्टाचाराला तिलांजली देत जातीने हजर होते. (वृत्तसंस्था)