शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील लेविस्टनमध्ये अंदाधुंद गोळीबार; 22 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 07:56 IST

पोलिसांनी हल्लेखोराचा फोटो जारी करत लोकांकडे मदत मागितली आहे. फोटोमध्ये लांब बाह्यांचा शर्ट आणि जीन्स परिधान केलेली एक दाढी असलेली व्यक्ती फायरिंग रायफलने गोळीबार करताना दिसत आहे.

अमेरिकेतील मेन राज्यामधील लेविस्टन येथे एक युवकाने अंदाधुंद फायरिंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून 50 ते 60 जण जखमी झाले आहेत. यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्रीच्या सुमारास एका सक्रिय शूटरने हा गोळीबार केला.

अँड्रोस्कोगिन काउंटी शेरीफ कार्यालयाने (पोलीस) आपल्या फेसबुक पेजवर संशयिताचे दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत बंदूकधारी आपल्या खांद्याला बंदूक लावून उभा आहे. तर एक फोटोत आस्थापनेत प्रवेश करताना दिसत आहे आणि सध्या फरार आहे.

पोलिसांनी जारी केला फोटो -पोलिसांनी हल्लेखोराचा फोटो जारी करत लोकांकडे मदत मागितली आहे. फोटोमध्ये लांब बाह्यांचा शर्ट आणि जीन्स परिधान केलेली एक दाढी असलेली व्यक्ती फायरिंग रायफलने गोळीबार करताना दिसत आहे. यासंदर्भात, लेविस्टनमधील सेंट्रल मेन मेडिकल सेंटरने एक निवेदन जारी केले असून, या घटनेत " मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. लेविस्टन अँड्रोस्कोगिन काउंटीचा भाग असून मेन मधील सर्वात मोठे शहर असलेल्या पोर्टलँडच्या उत्तरेला जवळपास 56 किमी अंतरावर आहे.

लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन -अँड्रोस्कोगिन काउंटी शेरिफच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात, "आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत. आणि सर्व व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद करण्याचे आवाहन करत आहोत.' मेन डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीच्या एका प्रवक्त्याने नागरिकांना आपल्या घरात दार बंद करून राहण्याचे आवाहनही केले आहे. 

 

टॅग्स :AmericaअमेरिकाFiringगोळीबारDeathमृत्यूPoliceपोलिस