शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

इस्लाम म्हणजे काय हे जगानं भारताकडून शिकावं; UAE च्या मुस्लिम संघटनेनं आरसाच दाखवला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 11:47 IST

संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) जागतिक मुस्लिम समुदाय परिषदेने भारतीय इस्लामवर 'धर्मशास्त्र, न्यायशास्त्र आणि समकालीन परंपरा: इस्लामचे भारतीयीकरण' हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) जागतिक मुस्लिम समुदाय परिषदेने भारतीयइस्लामवर 'धर्मशास्त्र, न्यायशास्त्र आणि समकालीन परंपरा: इस्लामचेभारतीयीकरण' हे पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकात इस्लामच्या प्रादेशिक स्वरूपांवर जोर देण्याचे आणि इस्लामच्या एका रुपाला न मानण्याबद्दल सांगितलं आहे. द न्यू इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार या पुस्तकात इस्लामच्या खऱ्या प्रतिनिधीत्वाच्या रुपात सादर केल्या जात असलेल्या धर्माच्या 'अरबीकरणा’वर चर्चा करण्यात आली आहे.

“अरब संस्कृतीला इस्लामच्या रुपात रोत्साहन देण्यात आणि इस्लामच्या केवळ एकाच प्रकाराला स्वीकारण्यात अनेक अडचणी आहेत,” असे मत मुस्लिम परिषदेचे ज्येष्ठ संशोधक डॉ. अब्बास पनक्कल यांनी व्यक्त केलं. या पुस्तकात ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ, वँकोवरचे डॉ. सबेस्टिअन आर प्रांज, ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे डॉ. मोइन अहमद निजामी आणि नालसर युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, हैदराबादचे डॉ. फैजान मुस्तफा यांच्या लेखांचा समावेश आहे.

भारतीय इस्लामचं मॉडेल उत्तम उदाहरण ठरू शकतं - मुस्लिम परिषदडॉ. सेबॅस्टियन आर. प्रांज यांनी या पुस्तकात 'मान्सून इस्लाम' हा शब्दप्रयोग केला आहे. हा शब्द इस्लाम या धर्मातील विविधता दर्शवतो. त्यांनी मान्सूनच्या वाऱ्यांची दिशेनंतर दक्षिण आशियामध्ये प्रवास करणाऱ्या अरब व्यापाऱ्यांना लक्षात घेऊन हा शब्दप्रयोग केला आहे. इस्लामचा प्रचार करणारे ते सामान्य अरब व्यापारी ना कोणत्या सरकारचे प्रतिनिधी होते, ना ते मान्यता असलेले धार्मिक अधिकारी होते. त्या व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्कृती आत्मसात करून बाहेर इस्लामचा प्रसार केला. या इस्लाममध्ये धर्माचा गाभा जसा आहे तसाच ठेवला गेला, असं प्रांज यांनी म्हटलं आहे. मलबार किनार्‍यावरील मशिदी हिंदू आणि मुस्लिम स्थापत्यकलेच्या संमिश्रणाची जिवंत उदाहरणे आहेत, असंही ते म्हणतात. त्यांनी आपल्या पुस्तकात दक्षिण भारतातील काही मंदिरांमध्ये हिंदु आणि मुस्लिमांद्वारे पूजा केली जाण्याचाही उल्लेख केला आहे.

“मुस्लिम शासकांनी मंदिरांना अनुदान देत, गोहत्या बंदी करत आणि हिंदूंना महत्त्वाच्या पदांवर ठेवून सांस्कृतिक परस्परसंवादाला चालना दिली. ऐतिहासिक पुस्तक चचनामानुसार मुस्लिमांनी ख्रिश्चन आणि यहुदींप्रमाणे हिंदूंनाही आपलंसं केलं,” असं आपल्या लेखात डॉ. मुस्तफा यांनी म्हटलं आहे. काही मुस्लिम शासकांनी आपल्या शिक्क्यांवर देवी लक्ष्मी आणि नंदीची आकृतीही साकारली होती, असंही त्यांनी लिहिलं आहे. भारतीय इस्लाम मॉडेल जगभरातील अनेक मुस्लिम समुदायांसाठी एक चांगल्या उदाहरणाच्या रुपात काम करू शकतो, असं अबू धाबी स्थित मुस्लिम परिषदेचं म्हणणं आहे.

टॅग्स :United Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीIslamइस्लामIndiaभारत