शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

जगातील टॉप १०० विद्यापीठांमध्ये भारतातील अकरांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 06:42 IST

चीनच्या सर्वाधिक ३0 विद्यापीठांचा समावेश : जगातील ५३३ संस्थांमध्ये ५६ भारतीय विद्यापीठांचे फूल रँकिंग

अहमदाबाद : टाइम्स हायर एज्युकेशनच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या देशांत यावर्षी ११ भारतीय विद्यापीठांनी स्थान पटकावले असून, २०१५ पासून भारताला हे सर्वात जास्त प्रतिनिधित्व मिळाले आहे. २०१५ पासून पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये ११ भारतीय शैक्षणिक संस्थांनी स्थान पटकावण्याची ही दुसरी वेळ आहे.

टाइम्स हायर एज्युकेशनच्या माहितीनुसार पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये चीनच्या सर्वात जास्त ३० विद्यापीठांनी स्थान पटकावले आहे. या रँकिंगसाठी ४७ देश आणि विभागांचा समावेश होता. एकूण ५३३ विद्यापीठांत एकूण ५६ भारतीय विद्यापीठांनी फूल रँकिंग मिळवले होते. टॉप भारतीय विद्यापीठांत इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सने (बंगळुरू) पहिले स्थान मिळवले होते, तरी दोन पायऱ्या खाली येऊन १६ क्रमांकावर आले. त्यानंतर इंडियन इन्स्टिस्ट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (खरगपूर) आणि आयआयटीने (मुंबई) अनुक्रमे ३२ व ३४ वे स्थान मिळवले. ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आॅफ इमिनन्स स्कीममध्ये भाग घेतलेल्या विद्यापीठांपैकी एक अमृत विश्व विद्यापीठमने प्रथमच पहिल्या १०० संस्थांच्या यादीत ५१ वे स्थान मिळवले.२०१९ मध्ये हे विद्यापीठ १४१ व्या स्थानी होते. २०१९ च्या तुलनेत अमृत विद्यापीठमने रँकिंगच्या सगळ्या मापनात (मेट्रिक्स) सुधारणा केल्याचे टाइम्स हायर एज्युकेशनने म्हटले. इन्स्टिट्यूटस् आॅफ इमिनन्स स्कीममध्ये समाविष्ट असलेल्या व पहिल्या १०० संस्थांच्या यादीत स्थान मिळवलेल्या विद्यापीठांनी रँकिंगमध्ये फार मोठी सुधारणा केली आहे.

या विद्यापीठांनी अनेक बदल स्वीकारून पहिल्या १०० च्या यादीत स्थान मिळवावे, अशी सरकारची इच्छा असते. त्यात विदेशी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, आॅनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे आणि जगातील उत्कृष्ट विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्याला प्रोत्साहन देणे आदीचा समावेशआहे.आयआयटी खरगपूर, दिल्लीने मिळविले स्थानच्आयआयटीने (खरगपूर) २३ पायºया चढून ३२ वे स्थान मिळवले, तर आयआयटी दिल्लीने २८ पायºया चढून ३८ वे स्थान मिळवले. आयआयटीने (मद्रास) १२ पायºयांची प्रगती करून ६३ वे स्थान मिळवले. आयआयटी (रोपार) आणि इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजीने (मुंबई) टॉप १०० रँकिंगमध्ये आपापल्या पहिल्याच प्रयत्नात अनुक्रमे ६३ व ७३ वे स्थान मिळवले.च्इन्स्टिट्यूट आॅफ इमिनन्स स्कीम सहभागी होणाºया विद्यापीठांना जगातील पहिल्या १०० संस्थांच्या यादीत (टाइम्स हायर एज्युकेशनच्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगसह) स्थान मिळवण्यासाठी शासकीय अनुदान तेही जास्त स्वायतत्तेसह उपलब्ध करून देते.

टॅग्स :delhiदिल्लीIIT Mumbaiआयआयटी मुंबईcollegeमहाविद्यालय