ट्रम्प यांचे इमिग्रेशनचे नवे प्रस्ताव भारतीयांना मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:01 IST2017-10-10T01:01:00+5:302017-10-10T01:01:21+5:30

डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इमिग्रेशन प्रस्तावांचे काही संच मंजुरीसाठी अमेरिकी लोकप्रतिनिधीगृह काँग्रेसला पाठविले आहेत.

 India's new proposals for Trump's immigration | ट्रम्प यांचे इमिग्रेशनचे नवे प्रस्ताव भारतीयांना मारक

ट्रम्प यांचे इमिग्रेशनचे नवे प्रस्ताव भारतीयांना मारक

वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इमिग्रेशन प्रस्तावांचे काही संच मंजुरीसाठी अमेरिकी लोकप्रतिनिधीगृह काँग्रेसला पाठविले आहेत. हे प्रस्ताव भारतीयांसाठी मारक असल्याचे समोर येत आहे. अमेरिकेत काम करणाºयांची अल्पवयीन मुले आणि वैवाहिक जोडीदार सोडून इतर कुटुंबीयांना ग्रीन कार्ड न देण्याची तरतूद या प्रस्तावांत आहे. भारतीय व्यावसायिकांसाठी ही बाब जाचक ठरणार आहे.
ट्रम्प प्रशासनाची नवी पद्धती गुणवत्ताधिष्ठित आहे. कुटुंबाधिष्ठित ग्रीन कार्ड देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी प्रस्तावित केला आहे.

Web Title:  India's new proposals for Trump's immigration