देशाची नाचक्की करणा-या 'या' भारतीयांना विदेशात झाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 06:12 PM2017-10-03T18:12:40+5:302017-10-03T18:48:54+5:30

आर्थिक अफरातफर प्रकरणात अटक झाल्यानंतर काही वेळातच विजय मल्ल्याची सुटका करण्यात आली. ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेल्या मल्ल्याला लंडनमध्ये दुस-यांदा अटक झाली.

The Indians who dance to the country have been arrested in foreign countries | देशाची नाचक्की करणा-या 'या' भारतीयांना विदेशात झाली अटक

देशाची नाचक्की करणा-या 'या' भारतीयांना विदेशात झाली अटक

Next

मुंबई - आर्थिक अफरातफर प्रकरणात अटक झाल्यानंतर काही वेळातच विजय मल्ल्याची सुटका करण्यात आली. ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेल्या मल्ल्याला लंडनमध्ये दुस-यांदा अटक झाली. याआधी 13 जून रोजी विजय मल्ल्याला अटक करण्यात आली होती. भारताने विजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण करण्याची विनंती केल्यानंतर ही अटकेची कारवाई झाली होती. विजय मल्ल्यावर भारतीय बँकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. 

 

अबू सालेम 
अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला 20 सप्टेंबर 2002 रोजी पोर्तुगालच्या लिस्बन शहरातून अटक करण्यात आली होती. अभिनेत्री मोनिका बेदीलाही त्याच्यासोबत अटक करण्यात आली होती. मुंबईतील 1993 साखळी बॉम्बस्फोटाची मालिका आणि गुलशन कुमार हत्या प्रकरणात न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अबू सालेमला फाशी होणार नाही या अटीवर पोर्तुगालने त्याचे प्रत्यापर्ण केले होते. अबू सालेमचं खासगी आयुष्य हे एखाद्या सिनेमाच्या कथेपेक्षा वेगळं नाही. अभिनेत्री मोनिका बेदीसोबतचे त्याचे प्रेम प्रकरण बरेच गाजले. 

छोटा राजन
मुंबई अंडरवर्ल्डमध्ये दरारा असलेल्या छोटा राजनला 26 ऑक्टोंबर 2015 रोजी इंडोनेशियाच्या बाली बेटावरील एका रिसॉर्टमधून अटक करण्यात आली. दाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार अशी राजनची ओळख होती. मुंबईमध्ये राजनच्या नावाचा एक दरारा होता. पण 1993 मध्ये दाऊद टोळीशी फिस्कटल्यानंतर राजनने स्वत:ची टोळी उभारुन दाऊदला टक्कर दिली. 2015 मध्ये भारताकडे हस्तांतरण करण्यात आले. राजनवर सध्या विविध गुन्ह्यांप्रकरणी खटला सुरु आहे. 

श्रीधर पोटाराझू

अमेरिकेतील प्रसिद्ध भारतीय वंशाचे डॉक्टर श्रीधर पोटाराझू यांना काही महिन्यांपूर्वी आर्थिक घोटाळा प्रकरणी अमेरिकन न्यायालयाने दहावर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. कंपनीच्या शेअर होल्डर्सची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप होते. श्रीधर पोटाराझू नेत्र तज्ञ आहेत. अमेरिकेत स्थायिक असलेल्या भारतीयांसाठी ते विविध कार्यक्रमांचे आयोजन करायचे. 

रजत कुमार गुप्ता

भारतीय वंशाचे प्रसिद्ध अमेरिकन बिझनेसमॅन रजत कुमार गुप्ता यांना अमेरिकेत इनसायडर ट्रेडिंग प्रकरणात दोन वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. गोल्डमॅन साच्स अशा बडया कंपन्यांच्या बोर्डवर त्यांनी काम केले होते. 


 

Web Title: The Indians who dance to the country have been arrested in foreign countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.