अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्ष कार्टर यांच्या नावावरून ठेवण्यात आलंय भारतातील 'या' गावाचं नाव, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 10:12 IST2024-12-30T10:09:55+5:302024-12-30T10:12:39+5:30
Indian Village named after Jimmy Carter : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी १९७८ साली भारताला भेट दिली होती

अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्ष कार्टर यांच्या नावावरून ठेवण्यात आलंय भारतातील 'या' गावाचं नाव, कारण...
Indian Village named after Jimmy Carter : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. जिमी कार्टर यांचे भारताशी घट्ट नाते आहे. त्यांच्या कार्याची छाप भारतावरही पडली. कार्टर यांना 'भारताचे मित्र' म्हटले जायचे. १९७७ मध्ये, आणीबाणी उठवल्यानंतर आणि जनता पक्षाच्या विजयानंतर ते भारताला भेट देणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते. १९७८ मध्ये त्यांनी भारताला भेट दिली. याच काळात त्यांच्या दौऱ्यामुळे भारतातील एका गावाचे नाव 'कार्टरपुरी' ठेवण्यात आले होते.
अमेरिकेचे अध्यक्ष जिमी कार्टर ३ जानेवारी १९७८ मध्ये गुरुग्राम जिल्ह्यातील दौलतपूर नसिराबाद गावात आले. या गावात त्यांनी नीट पाहणी केली. तेथील गावकरी त्यांच्यावर इतके खुश झाले की त्यांनी कार्टर यांना हरियाणवी पोशाखही भेट दिला. त्यावेळी त्या सरकारने या गावाचे नाव त्यांच्या नावावरून ठेवले आणि त्यामुळे दौलतपूर नशिराबाद ही 'कार्टरपुरी' झाले.
कार्टर फक्त हरयाणाच्या गावातच का गेले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दौलतपूर नसिराबाद गावातच का गेले? असे प्रश्न बरेचवेळा येतो. त्याचे उत्तर असे की त्यांची आई बेसी लिलियन अनेकदा या गावात येत असे. त्यामुळेच ते या गावाला भेट देण्यासाठी आले होते. याशिवाय जिमी कार्टर यांना भारतातील एखादे गाव आणि संस्कृतीदेखील पाहायची होती. हे गाव दिल्लीच्या अगदी जवळ होते, त्यामुळेच त्यांनी ते गाव निवडले होते. कार्टर यांची गावातील भेट इतकी यशस्वी झाली की काही काळानंतर गावातील रहिवाशांनी गावाला 'कार्टरपुरी' असे नाव दिले. जेव्हा कार्टर यांना २००२ मध्ये नोबेल शांतता पारितोषिक मिळाले, तेव्हा गावाने उत्सव साजरा केला होता. तसेच कार्टरपुरीमध्ये ३ जानेवारीला गावाला सुट्टी असते.