न्यूयॉर्कच्या टाइम्स चौकात प्रथमच तिरंगा फडकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 07:28 IST2020-08-12T03:53:38+5:302020-08-12T07:28:38+5:30
भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज ध्वजवंदनाच्या जाहीर कार्यक्रमात प्रथमच दिमाखाने फडवण्यात येणार

न्यूयॉर्कच्या टाइम्स चौकात प्रथमच तिरंगा फडकणार
वॉशिंग्टन : अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांच्या वतीने येत्या शनिवारी स्वातंत्र्यदिनी न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठेच्या टाइम्स चौकात भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज ध्वजवंदनाच्या जाहीर कार्यक्रमात प्रथमच दिमाखाने फडविण्यात येणार आहे.
‘दी फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्स’ या अमेरिकेतील भारतीयांच्या संघटनांच्या महासंघाने हा कार्यक्रम आयोजित केला असून, न्यूयॉर्कमधील भारताचे महावाणिज्यदूत रणधीर जयस्वाल यांच्या हस्ते टाइम्स चौकात ध्वजारोहण होईल. ‘एफआयए’चे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.