भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत गोळ्या घालून हत्या, कुटुंबांवर मोठा आघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 14:25 IST2025-01-20T14:22:45+5:302025-01-20T14:25:24+5:30
अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हा विद्यार्थी पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत होता.

भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत गोळ्या घालून हत्या, कुटुंबांवर मोठा आघात
अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिक्षण घेत असलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. वॉशिंग्टन डीसीमध्ये त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यात त्याचा मृत्यू झाला. (Indian Student Shot Dead in USA)
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मिळालेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेला विद्यार्थी हैदराबादचा रहिवासी आहे. त्याचे नाव रवि तेजा असे असून, पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी तो अमेरिकेत गेला होता.
रवि तेजा याच्यावर एका गॅस स्टेशनजवळ गोळ्या झाडण्यात आल्या. २०२२ मध्ये तो शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. मुलाची हत्या झाल्याची माहिती कळल्यानंतर रविच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.
नोव्हेंबरमध्येही एका विद्यार्थ्याची हत्या
गेल्या वर्षी म्हणजे नोव्हेंबर २०२४ मध्ये शिकागोमध्ये अशाच पद्धतीने एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली होती. हा विद्यार्थी तेलगणाचा होता. तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील रामन्नापेट येथील रहिवासी होती.
२६ वर्षीय नुकरपू साई तेजा हा शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेला होता. त्याला अमेरिकेत जाऊन चार महिनेच झाले होते. त्याची शिकागोमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली.