शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत भारतीय विद्यार्थी ५ दिवसांपासून बेपत्ता! कॅलिफोर्नियात शोधमोहीम तीव्र; ओवैसींनी संसदेत विचारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 15:43 IST

कॅलिफोर्नियातील नामांकित बर्कले युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्सचे शिक्षण घेणारा भारतीय विद्यार्थी श्रीनिवासैया गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता आहे.

उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कॅलिफोर्नियातील नामांकित बर्कले युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्सचे शिक्षण घेणारा भारतीयविद्यार्थी श्रीनिवासैया गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील भारतीय समुदायात चिंतेचे वातावरण असून, भारतात त्याच्या कुटुंबाची अन् मित्रपरिवाराची अवस्था बिकट झाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी हा मुद्दा थेट संसदेत उपस्थित केला आहे.

कोण आहे श्रीनिवासैया?

मूळचा बेंगळुरूचा रहिवासी असलेला श्रीनिवासैया अत्यंत हुशार आणि तल्लख बुद्धिमत्तेचा विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. त्याने बेंगळुरूच्या श्री वाणी एज्युकेशन सेंटरमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने देशातील नामांकित आयआयटी मद्रासमधून पदवी संपादन केली आणि पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेला गेला. सहा फूट उंच आणि सुदृढ शरीरयष्टी असलेल्या श्रीनिवासैयाच्या ओळखीच्या लोकांनी त्याला ब्रिलियंट आणि अत्यंत नम्र स्वभावाचा तरुण असल्याचे म्हटले आहे.

पाचव्या दिवशीही शोध सुरू; सोशल मीडियावर मदतीचा ओघ

श्रीनिवासैया बेपत्ता होऊन आज पाच दिवस उलटले आहेत, तरीही त्याचा कोणताही सुगावा लागलेला नाही. स्थानिक पोलिसांसोबतच आता तिथले नागरिकही शोधमोहिमेत सहभागी झाले आहेत. 'रेडिट'सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याच्या शोधासाठी खास थ्रेड बनवण्यात आले आहेत. लेक अंजा परिसरात बोटींच्या सहाय्याने मोठी शोधमोहीम राबवली जात आहे. काही स्वयंसेवक आपल्या शिकारी कुत्र्यांच्या सहाय्याने जंगलात आणि परिसरात त्याचा शोध घेत आहेत.

संसदेत गदारोळ: ओवैसींचा सरकारला जाब

भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करत असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारला प्रश्न विचारला की, परदेशात शिकणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नेमकी काय पावले उचलली जात आहेत? यावर परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर दिले की, "भारतीय दूतावास आणि मिशन परदेशातील विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात असतात. त्यांना वेळोवेळी संकटांची जाणीव करून देण्यासाठी ओरिएंटेशन सेशन आणि ॲडव्हायझरी जारी केली जाते."

चिंता वाढली!

लिंक्डइनवर श्रीनिवासैयाच्या सहकाऱ्यांनी त्याच्या कामाचे आणि स्वभावाचे मोठे कौतुक केले आहे. मात्र, इतका हुशार आणि जबाबदार मुलगा अचानक गायब कसा झाला, याचे गूढ अद्याप उकललेले नाही. अमेरिकेतील पोलीस तपास करत असले तरी पाच दिवस उलटल्याने आता घातपाताची शक्यता किंवा इतर संकटांची भीती व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian student missing in US; search intensifies, Owaisi raises issue.

Web Summary : Indian student Saketh Sreenivasaiah, studying in California, missing for five days. Search underway. Owaisi questioned the government about student safety in parliament. Consulate is in contact with family.
टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतStudentविद्यार्थी