शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

डिस्नीच्या ३-डी ‘जंंगल बुक’मध्ये भारतीय वंशाचा ‘मोगली’

By admin | Updated: July 18, 2014 01:45 IST

वॉल्ट डिस्नी फिल्मस् ही हॉलीवूडमधील विख्यात कंपनी रिडयार्ड किपलिंग यांच्या ‘जंगल बुक’ या कथानकावर एक ३-डी चित्रपट काढणार

वॉशिंग्टन : वॉल्ट डिस्नी फिल्मस् ही हॉलीवूडमधील विख्यात कंपनी रिडयार्ड किपलिंग यांच्या ‘जंगल बुक’ या कथानकावर एक ३-डी चित्रपट काढणार असून त्यातील ‘मोगली’ या प्रमुख व एकमेव मानवी पात्राची भूमिका करण्यासाठी नील सेठी या १० वर्षांच्या भारतीय वंशाच्या मुलाची निवड करण्यात आली आहे.मुंबईत जन्मलेल्या रुडयार्ड किपलिंग यांचा ‘जंगल बुक’ हा जंगलकथांचा संग्रह १२० वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. त्यावर आधारित झोल्तान कोर्डा यांनी काढलेला त्याच नावाचा माहितीपट जगप्रसिद्ध असून गेल्या किमान दोन पिढ्यांच्या हृदयावर त्यातील पात्रे कोरली गेलेली आहेत. आता डिस्नी कंपनीकडून तयार केला जात असलेला ‘जंगल बुक’ हा त्याचाच पूर्ण लांबीच्या स्वरूपातील ३-डी चित्रपट असेल.मोगलीच्या भूमिकेसाठी हजारो इच्छुकांच्या ‘आॅडिशन्स’ घेण्यात आल्या व त्यातून नील सेठी या न्यूयॉर्कमधील १० वर्षांच्या भारतीय-अमेरिकन मुलाची निवड करण्यात आली आहे. नीलचे अभिनयाच्या क्षेत्रातील हे पदार्पण असेल, असे डिस्नी कंपनीने त्यांच्या ब्लॉगवर जाहीर केले.याआधी ‘आयर्न मॅन’, ‘काऊबॉईज’ आणि ‘एलियन्स’ अशा गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले व सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असलेल्या ‘शेफ’ या चित्रपटातील प्रमुख भूमिका वठविणारे डॉन फावेऱ्यू हेच ‘जंगल बुक’चेही दिग्दर्शन करणार आहेत. नील सेठीच्या निवडीविषयी त्यांनी ब्लॉगवर म्हटले की, कोणत्याही चित्रपटामध्ये पात्रनिवड ही अत्यंत महत्त्वाची असते व त्याच दृष्टीने मोगलीच्या भूमिकेसाठी सुयोग्य अशा बाल अभिनेत्याची निवड होणे गरजेचे होते. नीलकडे प्रचंड प्रतिभा आणि करिश्मा आहे. त्याच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे व तो ती समर्थपणे पेलू शकेल याची मला खात्री आहे. त्याच ब्लॉगवर डिस्नीच्या कास्टिंग डायरेक्टर सारा फिन यांनी म्हटले की, मोगलीच्या पात्रातील आत्मा, विनोद व धैर्य यांचे नील सेठी हे मूर्तिमंत रूप असल्याचे मला वाटते. तो प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावाचा असून त्याची बुद्धिमत्ता वयाच्या तुलनेत खूपच प्रगल्भ आहे. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता ठाम राहण्याच्या त्याच्या अंगभूत वृत्तीने आम्हा सर्वांना प्रभावित केले आहे.नीलकडे अभिनयाचा व्यावसायिक अनुभव बिलकूल नसला तरी त्याच्यातील उपजत करिश्मा व नैसर्गिक सहजतेने आम्हाला जिंकून घेतले, असेही सारा फिन यांनी नमूद केले. ‘जंगल बुक’ हा चित्रपट सजीव अभिनय आणि अ‍ॅनिमेशन यांचे मिश्रण असेल व हा चित्रपट ९ आॅक्टोबर २०१५ रोजी प्रदर्शित होईल. (वृत्तंसस्था)