शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

अमेरिकेत पत्नीसमोर भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या; दोन आठवड्यापूर्वी झाले होते लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 15:43 IST

अमेरिकेतील इंडियाना राज्यात भारतीय वंशाच्या व्यक्तीची त्याच्या पत्नीसमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली

Indian Man Shot in America: गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत भारतीयांच्या हत्येचे सत्र सुरुच आहेत. अशातच अमेरिकेत भारतीय वंशाच्या नवविवाहित तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हा सगळा कॅमेरात कैद झाला असून पुन्हा एकदा अमेरिकेत भारतीयांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. मृताच्या कुटुंबीयांनी पोलीस तपासात त्रुटी असल्याचा आरोप करत आरोपींना कठोर शिक्षा मिळावी आणि मुलाला न्याय देण्याची मागणी केली आहे. पतीची समोरच हत्या झाल्याने पत्नीदेखील धक्क्यातून सावरलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी अमेरिकेच्या इंडियाना राज्यात भारतीय वंशाच्या २९ वर्षीय गेविन दसौरची एका रोड रेजच्या घटनेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. नवविवाहित गेविन दसौर आपल्या मेक्सिकन पत्नीसह घरी जात होता. त्यानंतर वाद झाल्यानंतर आरोपीने इंडी शहराच्या एका चौकात त्याच्यावर गोळ्या झाडल्या. गोळी लागताच दासौर खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. दसौर कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गेविन आणि ट्रक ड्रायव्हरमध्ये ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला, त्यानंतर ट्रक ड्रायव्हरने त्याच्यावर गोळीबार केला.

गेविन हा अमेरिकेत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करायचा. १६ जुलै रोजी संध्याकाळी गेविन आणि त्याची पत्नी आणि बहीण दीपशी एका मॉलमध्ये गेले होते.  घरी परतत असताना एका पिकअप ट्रकने त्यांना धडक दिली, त्यामुळे त्यांची गाडी रस्त्यावरून खाली उतरली. गेविनने ट्रकचा पाठलाग करून त्याला थांबवले, पण चालकाने गेविनला हसून दाखवले. त्यानंतर पिकअप चालकाने अचानक गेविनवर तीन गोळ्या झाडल्या.

गेविन हा आग्र्याचा रहिवासी होता. त्याच्या मृत्यूच्या दोन आठवडे आधी म्हणजे २९ जून रोजी त्याचे विवियाना झामोरासोबत लग्न झाले होते. मात्र काही दिवसातच त्याची हत्या झाली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दसौर हा एका चौकात आपल्या गाडीवरुन उतरुन पिकअप ट्रकच्या चालकावर ओरडताना दिसत आहेत. यानंतर तो हातात बंदूक घेऊन ट्रकच्या दरवाजावर हात मारतो. त्यानंतर पिकअप ट्रकचा चालक त्याच्याजवळील बंदुकीने दसौरवर गोळ्या चालवतो. 

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारीIndiaभारत