शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्‍तानने भारतीय दुतावासातल्या 'त्या' कर्मचाऱ्यांचे हात-पाय बांधले अन् मारहाणही केली; दिली अशी धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 14:08 IST

पाकिस्‍तानी माध्यमांनी दावा केला आहे, की  भारतीय कर्मचाऱ्यांची कार एका पादचाराला धडकली. म्हणून त्यांना अटक करण्यात आली. हे प्रकरण सेट करण्यासाठी अपहरणकर्त्यांनी या कर्मचाऱ्यांना आमच्याकडून अॅक्सीडेंट झाला, असे व्हिडिओवर बोलायलाही लावले आहे.

ठळक मुद्देनियोजनबद्ध पद्धतीने केले गेले अपहरण.पाकिस्तानने त्यांच्यासोबत अत्यंत क्रूर व्यवहार केला आहे.बदला घेण्यासाठी पाकिस्तानचा ड्रामा?

नवी दिल्‍ली :पाकिस्ताननेभारतीय दुतावासातील दोन कर्मचाऱ्यांना बंधक बनवून टॉर्चर केल्याचा प्रकार घडला आहे. सोमवारी सकाळी अपहरण करण्यात आलेल्या दोन कर्मचाऱ्यांना सायंकाळी उशिरा सोडण्यात आले. पाकिस्तानने त्यांच्यासोबत अत्यंत क्रूर व्यवहार केला आहे. त्यांना काही माहितीसाठी जवळपास 12 तास ताब्यात ठेवून प्रचंड मारहाण केली गेली. या दोघांनी जेव्हा पाणी मागीतले तेव्हा हल्लेखोरांनी त्यांना अत्यंत घाणेरडे पाणी दिले. हिंदुस्‍तान टाइम्‍सने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांनाही त्यांची भूमिका आणि हाय कमिशच्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती विचारण्यात आली.

चीनची भीती की चिथावणी? नेपाळ उचलतोय मोठं पाऊल; आता थेट अमेरिकेलाच देणार 'तगडा' झटका!

नियोजनबद्ध पद्धतीने केले गेले अपहरण -सोमवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास, दोन कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आले. त्यांना दुतावासाजवळ असलेल्या एका पेट्रोलपंपावरून उचलण्यात आले होते. सहा गाड्यांमध्ये 15 ते 16 लोक आले होते. ते शस्त्रसज्ज होते. यानंतर कर्मचाऱ्यांचे हात बांधून त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली. यानंतर त्यांना साधारणपणे 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका ठिकाणी नेण्यात आले. तेथे जवळपास 6 तास त्यांची चौकशी झाली. यादरम्यान त्यांना अनेकदा काठीने मारहाण करण्यात आली आणि घाणेरडे पाणीही देण्यात आले. या दोघांच्याही मानेवर, चेहऱ्यांवर आणि मांड्यांवर मारहाण केल्याच्या खुना आहेत.

 

खोटा गुन्हा दाखल -इस्‍लामाबाद पोलिसांनी या दोन्ही अधिकाऱ्यांना जाळ्यात घेण्याची पूर्ण तयारी केली होती. एचटीने एक एफआयआर बघितली आहे. यात दावा करण्यात आला आहे, की या दोघांच्या कारमधून 10,000 पाकिस्‍तानी रुपयांची बनावट करन्सी मिळाली आहे. पाकिस्‍तानी माध्यमांनी दावा केला आहे, की  भारतीय कर्मचाऱ्यांची कार एका पादचाराला धडकली. म्हणून त्यांना अटक करण्यात आली. हे प्रकरण सेट करण्यासाठी अपहरणकर्त्यांनी या कर्मचाऱ्यांना आमच्याकडून अॅक्सीडेंट झाला, असे व्हिडिओवर बोलायलाही लावले आहे. 

CoronaVirus News: खोटारड्या चीनचा बुरखा टराटरा फाटला; 'एकट्या वुहानमध्ये तब्बल 36 हजार लोकांवर अंत्यसंस्कार'

बदला घेण्यासाठी पाकिस्तानचा ड्रामा?आता हाय कमिशनच्या लोकांसोबत, असेच केले जाईल, अशी धमकी या दोघांनाही देण्यात आली. यानंतर त्यांना  9 वाजता भारतीय दूतावासाकडे सोपवण्यात आले. भारताने 31 मेरोजी पाकिस्‍ताच्या हायकमिशनच्या दोन कर्मचाऱ्यांना हेरगिरी करताना पकडले होते. यानंतर त्यांना 24 तासांच्या आत देश सोडायला लावले होते.

CoronaVirus News: 18 राज्यांतून येतेय 'खूश खबर'; पण, 'या' राज्यांमध्ये मात्र कोरोनाचा 'स्फोट'!

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतdelhiदिल्लीImran Khanइम्रान खान