भारतीय महिला डॉक्टरची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 05:43 IST2019-03-07T05:43:00+5:302019-03-07T05:43:12+5:30
संशयास्पद स्थितीत गायब असलेल्या भारतीय महिला दंत चिकित्सक प्रीती रेड्डी यांची हत्या करण्यात आली

भारतीय महिला डॉक्टरची हत्या
मेलबॉर्न : संशयास्पद स्थितीत गायब असलेल्या भारतीय महिला दंत चिकित्सक प्रीती रेड्डी यांची हत्या करण्यात आली असून, त्यांच्या मृतदेहावर चाकूने वार करण्यात आल्याच्या खुणा आढळल्या आहेत. सिडनीतील गजबजलेल्या भागातील रस्त्यावरील कारमधील सुटकेसमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. रविवारी त्या शेवटच्या दिसल्या होत्या. त्या मित्रासोबत एका हॉटेलात मुक्कामाला होत्या. प्रीती गायब झाल्याच्या वृत्तानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी रात्री तिच्या मित्राचा अपघाती मृत्यू झाला होता.