शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 17:28 IST

एका २९ वर्षीय भारतीय इंजिनिअरचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू झाला. दुबईमध्ये ही घटना घडली. स्कुबा डायव्हिंग ट्रेनिंगदरम्यान ही घटना घडली. 

दुबईमध्ये इंजिनिअर असलेल्या एका भारतीय अभियंत्याचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू झाला.  शुक्रवारी ही घटना घडली. २९ वर्षीय भारतीय इंजिनिअर सुट्टीनिमित्त आपल्या कुटुंबासोबत जुमैरा समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आला होता. त्यावेळी स्कुबा डायव्हिंग करत असताना त्याचा मृत्यू झाला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

इसाक पॉल ओलक्केंगिल असे मृत्यू झालेल्या भारतीयाचे नाव आहे. इसाकच्या काकांनी सांगितले की, दुबईतील स्कुबा डायव्हिंग क्षेत्रात ट्रेनिंग सुरू असताना ही घटना घडली.   

इसाकचा मृत्यू कसा झाला?

इसाकच्या काकांनी सांगितले की, ते प्रथमच स्कुबा डायव्हिंग करत होते. त्यामुळे ते ट्रेनिंग सेशनमध्ये सहभागी झाले होते. इसाक पाण्याखाली गेला. त्यावेळी त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यातच तो स्कुबा डायव्हिंग करणाऱ्या ग्रुपमधील इतरांपासून दूर दूर गेला. 

त्यानंतर त्याला तातडीने बाहेर काढण्यात आले. लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, असे इसाकच्या काकाने सांगितले. पाण्याखाली गेल्यानंतर इसाक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यातच त्याला कार्डियाक अरेस्ट झटका आला, असे डॉक्टरांनी सांगितले. 

इसाक मूळचा केरळचा आहे. तो संयुक्त अरब अमिरातीमध्ये इंजिनिअर म्हणून कामाला आहे. 

टॅग्स :DubaiदुबईDeathमृत्यूUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीKeralaकेरळ