शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 08:23 IST

इंडोनेशियन वायूसेना विद्यापीठाने भारत-पाकिस्तान हवाई युद्धाचे विश्लेषण करण्यासाठी सेमिनार आयोजित केला होता.

जकार्ता - मे महिन्याच्या सुरुवातीला भारत-पाकिस्तान संघर्षात जर पाकने अणुबॉम्बने हल्ला केला असता तर भारताने काय केले असते? याचा खुलासा इंडोनेशियात भारतीय संरक्षण खात्याने केला आहे. जकार्ता येथे तैनात भारतीय दूतावास कार्यालयातील भारतीय नौदलाचे कॅप्टन शिव कुमार यांनी इंडोनेशियन वायूसेनेसमोर भारताच्या निर्णयाबाबत सांगताना पाकिस्तानला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. इंडोनेशिया एअरफोर्स यूनिवर्सिटीत आयोजित २ महत्त्वाचे सेमिनार पार पडले. त्यात भारताने जगाला त्यांचे अणूधोरण स्पष्ट केले. जर पाकिस्तानने अणुबॉम्ब टाकला असता तर भारताने नकाशातून पाकिस्तानला मिटवला असता असा इशाराच नौदल कॅप्टन शिव कुमार यांनी दिला.

ऑपरेशन सिंदूरबाबत शिव कुमार म्हणाले की, जर भारतावर पाकिस्तानने अणुहल्ला केला असता तर हे स्पष्ट होते की, पाकिस्तानचं अस्तित्व नष्ट केले असते हे आमचे धोरण होते असा खुलासा त्यांनी इंडोनेशियात केला. शिव कुमार यांचे हे विधान सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात जे पाकिस्तानी नेते वारंवार भारताला अणुबॉम्बची धमकी देतात त्यांना हा इशारा दिला आहे. ऑपरेशन सिंदूरवेळीही भारताने पाकिस्तानला स्पष्ट शब्दात आम्ही कुठल्याही प्रकारचं न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग खपवून घेणार नाही असा इशारा दिला होता. त्याशिवाय यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा भारताविरोधात युद्ध समजले जाईल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होते. 

पाकिस्तानचा मागमूस पुसून टाकला असता...

इंडोनेशियन वायूसेना विद्यापीठाने भारत-पाकिस्तान हवाई युद्धाचे विश्लेषण करण्यासाठी सेमिनार आयोजित केला होता. ज्यात आधुनिक मिसाईल, ड्रोन, एअर डिफेन्स याच्या वापराबाबत चर्चा करण्यात आली. भारतीय हवाई दलाने ज्या अचूकपणे पाकिस्तानात हल्ले केले. दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानच्या ११ एअरबेसवर हल्ले केले या ऑपरेशनची माहिती इंडोनेशिया हवाई दलाला हवी होती. चर्चासत्रादरम्यान, भारताने 'अण्वस्त्र मर्यादे'च्या खाली राहून संतुलित परंतु प्रभावी लष्करी कारवाई केली आणि भारताने युद्ध पूर्णपणे नियंत्रणात ठेवले असं इंडोनेशियन संरक्षण तज्ञांनी सांगितले. 

दरम्यान, भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानविरोधात अत्याधुनिक प्रिसिजन गाइडेड मिसाइल, स्टील्थ ड्रोन आणि एंटी रेडिएशन शस्त्रांचा वापर केला. भारताचे हल्ले अचूक आणि गतीशील होते ज्यामुळे पाकिस्तानी एअरबेसवरून त्यांची लढाऊ विमाने उड्डाणच घेऊ शकली नाहीत. भारत या युद्धात अशा स्थितीत होता जिथे पाकिस्तानातील हवाई सैन्याला काहीच करता आले नसते. भारताने पाकच्या एअरबेसवर हल्ले करून यापुढच्या काळात पाकिस्तानने युद्धासाठी उकसवलं तर भारत काय करू शकतो हे दाखवून दिल्याचेही तज्ज्ञांनी म्हटलं. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानindian navyभारतीय नौदल