'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 08:16 IST2025-10-16T08:09:03+5:302025-10-16T08:16:21+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा रशियाकडून भारत तेल खरेदी करणार नसल्याचा दावा केला आहे.

'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असा दावा केला आहे. 'भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वैयक्तिकरित्या याबाबत आश्वासन दिल्याचे ट्रम्प यांनी बुधवारी सांगितले. दरम्यान, भारत सरकारने ट्रम्प यांच्या विधानाची पुष्टी केलेली नाही. युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी मॉस्कोवर दबाव आणण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांना या पावलामुळे बळकटी मिळेल. 'तेल मिळणार नाही. ते तेल खरेदी करत नाहीत,असेही ट्रम्प म्हणाले.
'हे एक मोठे पाऊल आहे. आता आम्ही चीनलाही असेच करायला लावणार आहोत. दरम्यान, याबाबत वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचे भारताचे आश्वासन हे जागतिक ऊर्जा राजनैतिकतेतील एक महत्त्वाचे वळण ठरू शकते. कारण युक्रेन युद्ध सुरू असताना वॉशिंग्टन मॉस्कोच्या तेल उत्पन्नात कपात करण्याचे प्रयत्न अधिक तीव्र करत आहे.
चार वर्षापासून युद्ध सुरू
युक्रेन आणि रशियामध्ये मागील चार वर्षापासून युद्ध सुरू आहे. रशियाच्या आक्रमणाने सुरू झालेले युक्रेनमधील युद्ध संपवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे ट्रम्प निराश झाले आहेत. त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दल असंतोष व्यक्त केला आहे, त्यांनी समाधानातील सर्वात मोठा अडथळा म्हणून वर्णन केले आहे आणि ते शुक्रवारी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेणार आहेत.
चीननंतर भारत हा रशियन तेलाचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार आहे आणि म्हणूनच ट्रम्प यांनी ऑगस्टमध्ये भारतावर शुल्क वाढवले. ट्रम्प म्हणाले की, भारत शिपमेंट ताबडतोब थांबवू शकत नाही, ही थोडी प्रक्रिया आहे, परंतु ती लवकरच पूर्ण होईल.