वॉशिंग्टन : भारतानेरशियाकडे तेलखरेदी करण्याचे थांबवण्याचे आश्वासन दिले आहे आणि या वर्षअखेर ही सर्व तेलखरेदी बंद होईल, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला आहे. तेलखरेदी थांबण्यासाठी थोडा वेळ लागेल. ही एक प्रक्रिया आहे. रशियाकडून तेलखरेदी करू नका असे आपण चीनलाही सांगणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. चीन व भारत हे रशियाचे सर्वांत मोठे तेल आयातदार देश आहेत.
बुधवारी व्हाइट हाउसमध्ये ट्रम्प यांनी भारत-रशिया तेलखरेदीचा मुद्दा पत्रकारांपुढे स्पष्ट केला. भारताने रशियाकडून सुमारे ४० टक्के तेलखरेदी थांबवली. ती पूर्ण थांबेल असे आश्वासन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच मला दिले. ते खूप चांगले गृहस्थ आहेत, अशीही पुस्ती ट्रम्प यांनी जोडली.
'चीनलाही खरेदी थांबवायला सांगेन'
रशियाकडून तेलखरेदी थांबवावी असे आपण चीनलाही सांगणार आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी लवकरच भेट होईल. यात रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी तेल किंवा अन्य माध्यमातून मला प्रयत्न करायचे आहेत, असे ट्रम्प यांनी सांगितले. रशियाकडून तेलखरेदी थांबवावी असे आपण चीनलाही सांगणार आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी लवकरच भेट होईल. यात रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी तेल किंवा अन्य माध्यमातून मला प्रयत्न करायचे आहेत, असे ट्रम्प यांनी सांगितले.
Web Summary : Trump claims India promised to stop Russian oil imports by year-end. He stated PM Modi assured him of this. Trump will also urge China to cease Russian oil purchases to end the Russia-Ukraine war.
Web Summary : ट्रम्प का दावा है कि भारत ने साल के अंत तक रूसी तेल का आयात बंद करने का वादा किया है। उन्होंने कहा कि पीएम मोदी ने उन्हें इस बात का आश्वासन दिया है। ट्रम्प रूस-यूक्रेन युद्ध को समाप्त करने के लिए चीन से भी रूसी तेल की खरीद बंद करने का आग्रह करेंगे।