भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 23:15 IST2025-09-05T23:15:18+5:302025-09-05T23:15:32+5:30

India vs America: भारत नमत नसल्याचे पाहून अमेरिकेचे नेते आता काहीही बरळू लागले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना आता भारत अमेरिकेची साथ सोडण्याची भिती वाटत आहे.

India vs America: India will apologize, come to the negotiating table; Donald Trump's secretary howard lutnick threatened | भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली

भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली

भारत आणि अमेरिकेमध्ये तणाव कमालीचा वाढला आहे. यामुळे भारताने चीन, रशियासोबत बैठका घेतल्या आहेत. तसेच येत्या सोमवारी ब्रिक्स देशांची तातडीची ऑनलाईन बैठक बोलावण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत झिरो टेरिफची ऑफर देत असल्याचा दावा केला होता. तसेच आज भारताला आम्ही गमावले असे वाटत असल्याचे म्हटले होते. आता त्यांचे सचिव हॉर्वर्ड लुटनिक यांनी भारत माफी मागेल आणि वाटाघाटीच्या टेबलवर येईल असे वक्तव्य केले आहे. 

भारत नमत नसल्याचे पाहून अमेरिकेचे नेते आता काहीही बरळू लागले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना आता भारत अमेरिकेची साथ सोडण्याची भिती वाटत आहे. रशिया, चीन आणि भारत हे तीन देश नुकतेच एकत्र आले होते. ट्रम्प यांनी पाकिस्तानकडून आपल्या व्यवसायाचा फायदा करून घेण्यासाठी भारताला ठोकरण्याची भूमिका घेतलेली आहे. परंतू ही बाब आता अमेरिकेलाच भारी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

 लुटनिक यांच्या ताज्या दाव्यानुसार भारत पुढील काही महिन्यांत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वाटाघाटी करेल. एक-दोन महिन्यांत भारत वाटाघाटीच्या टेबलावर असेल आणि तो माफी मागेल आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी तडजोड करण्याचा प्रयत्न करेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींशी कसे वागायचे हे त्यांच्या विवेकावर अवलंबून आहे आणि आम्ही तो निर्णय त्यांच्यावर सोडतो. म्हणूनच ते अध्यक्ष आहेत, अशी शेखीही लुटनिक यांनी मिरविली आहे. 

शिया संघर्षापूर्वी, भारत रशियाकडून दोन टक्क्यांपेक्षा कमी तेल खरेदी करत होता, परंतु आता ते ४०% तेल खरेदी करत आहे. अमेरिकेला पाठिंबा देणे किंवा रशिया आणि चीनशी मैत्री करणे यापैकी एकाची भारताला निवड करावी लागेल. भारत हा ब्रिक्समध्ये रशिया आणि चीनमधील दुवा आहे. त्याला त्यांच्यासारखेच व्हायचे असेल तर तसेच व्हावे, असेही लुटनिक बरळले आहेत. 

एकतर डॉलरला पाठिंबा द्या, अमेरिकेला पाठिंबा द्या, तुमच्या सर्वात मोठ्या ग्राहकाला, अमेरिकन ग्राहकाला पाठिंबा द्या, नाहीतर मला वाटते की तुम्हाला ५०% कर भरावा लागेल. आणि हे किती काळ चालते ते पाहूया, अशी धमकीही दिली आहे. 
 

Web Title: India vs America: India will apologize, come to the negotiating table; Donald Trump's secretary howard lutnick threatened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.