इस्रायलहून, अतुल कुलकर्णी, लोकमत न्यूज नेटवर्क, जेरुसलेम : भारताचे वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी इस्रायलच्या तीन दिवसीय अधिकृत दौऱ्याचा समारोप करताना इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग आणि पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांची स्वतंत्र भेट घेतली. दोन्ही बैठकींमध्ये भारत–इस्रायल सामरिक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला.
गोयल यांनी सर्वप्रथम इस्रायलचे राष्ट्रपती हर्झोग यांची भेट घेऊन भारतीय जनतेच्या व सरकारच्या शुभेच्छा त्यांना कळवल्या. या भेटीत व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान–तंत्रज्ञान, नवोपक्रम, तसेच व्यापक आर्थिक सहकार्यासंदर्भातील विषयांवर सखोल चर्चा झाली. गोयल यांनी इस्रायली भागीदारांसाठी भारतातील वाढत्या संधींचा उल्लेख करताना, भारत–इस्रायल मुक्त व्यापार करार चर्चांच्या दिशेने उचललेल्या पहिल्या मोठ्या पावलाची माहिती दिली.
यानंतर गोयल यांनी पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली. त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विशेष संदेश नेतन्याहू यांना दिला. दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, शेती, पाणी व्यवस्थापन आणि नवोपक्रम या क्षेत्रांमधील परस्पर सहकार्य वाढवण्यावरील पुढील दिशा निश्चित केली. भारताचे कौशल्य व इस्रायलची उच्च तंत्रज्ञान क्षमता एकत्र येऊन नवोपक्रम भागीदारीला मोठा वेग मिळू शकतो, असेही गोयल यांनी सोशल मीडियावर नमूद केले. गोयल यांच्या या भेटींमुळे दोन्ही देशांतील आर्थिक, तांत्रिक आणि रणनीतिक सहकार्याला नवी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
भागीदारी अधिक बळकट : नेतन्याहू
पंतप्रधान नेतन्याहू यांनीही गोयल यांच्याशी झालेल्या भेटीबाबत ट्विट करून भारत–इस्रायल भागीदारी अधिक बळकट होत असल्याचे सांगितले. भारत, इस्रायल आणि त्यानंतर युरोपपर्यंत जाणाऱ्या आर्थिक कॉरिडॉरच्या संकल्पनेलाही त्यांनी महत्त्वाचे पाऊल म्हटले. उभय देशांतील आर्थिक संबंधही वाढीला लागतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Web Summary : Piyush Goyal concluded his Israel visit, meeting President Herzog and Prime Minister Netanyahu. Discussions focused on bolstering India-Israel strategic partnerships, trade, technology, and innovation. Goyal highlighted growing opportunities in India and progress on a free trade agreement, aiming to enhance economic and technological cooperation.
Web Summary : पीयूष गोयल ने इजरायल दौरा संपन्न किया, राष्ट्रपति हर्ज़ोग और प्रधान मंत्री नेतन्याहू से मुलाकात की। भारत-इजरायल रणनीतिक साझेदारी, व्यापार, प्रौद्योगिकी और नवाचार को मजबूत करने पर चर्चा हुई। गोयल ने भारत में बढ़ते अवसरों और मुक्त व्यापार समझौते पर प्रगति पर प्रकाश डाला, जिसका उद्देश्य आर्थिक और तकनीकी सहयोग को बढ़ाना है।